scorecardresearch

Premium

सई ताम्हणकरने सोनाली कुलकर्णी व तिच्या नवऱ्याला ठेवलं होतं उपाशी, खुलासा करत म्हणाली, “कारण…”

मनोरंजन सृष्टीतील अनेक आघाडीचे कलाकार तिचे खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. यापैकीच एक म्हणजे सोनाली कुलकर्णी.

Sai sonali

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकर हिचं नाव कायमच वरच्या स्थानी असतं. आता फक्त मराठीतच नाही, तर हिंदी सिनेसृष्टीतही तिने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही अनेकदा चर्चेत असते. तिचा मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि मनोरंजन सृष्टीतील अनेक आघाडीचे कलाकार तिचे खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. यापैकीच एक म्हणजे सोनाली कुलकर्णी. परंतु सई ताम्हणकरने एकदा सोनाली कुलकर्णीला उपाशी ठेवल्याचं तिने कबूल केलं आहे.

‘झी मराठी’वर ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम काही दिवसांपूर्वी सुरू झाला. आतापर्यंत या कार्यक्रमांमध्ये अनेक राजकारणी, नेतेमंडळी यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली. आता या कार्यक्रमाच्या पुढील भागात अभिनेत्री सई ताम्हणकर पाहुणी कलाकार म्हणून उपस्थित राहणार आहेत. या भागातील एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये सईने सोनाली कुलकर्णीला उपाशी ठेवल्याचं म्हणत तेव्हा नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

rape-2
विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार
Niharika Konidela reacts on her divorce
उदयपूरमध्ये शाही सोहळ्यात केलं लग्न, वर्षभरातच पतीपासून विभक्त झाली अभिनेत्री; म्हणाली, “मला किती त्रास झाला हे…”
Alyy Khan Kajol kissing scene
“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…
Birth Centenary of Jananayak Karpuri Thakurji
जननायक कर्पुरी ठाकूर; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशेष लेख

आणखी वाचा : सई ताम्हणकरने थकवले मित्राचे हजारो रुपये, म्हणाली, “त्याच्या वशिल्याने मी…”

अवधूत गुप्तेने सई ताम्हणकरला विचारलं, “तू लोकांना घरी जेवायला बोलावतेस आणि तासंतास उपाशी ठेवतेस हे खरं आहे का?” त्यावर सई म्हणाली, “सोनाली कुलकर्णी च लग्न झाल्यावर मी तिला आणि तिच्या नवऱ्याला घरी जेवायला बोलावलं होतं. आम्ही घरी खूप टाईमपास करत होतो, मॅच बघत होतो. आम्ही गप्पांमध्ये आणि टाईमपास करण्यामध्ये इतके गुंतलो की मी दुपारचे जेवण बनवणार होते तो डिनर झाला.”

हेही वाचा : “सहा महिने एकत्र राहतो आणि सहा महिने वेगळं, कारण…,” आईबरोबरच्या नात्याबद्दल सई ताम्हणकरचा मोठा खुलासा

सई ताम्हणकरच्या या बोलण्याने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिचा हा दिलखुलास अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला असून सर्वजण या आगामी भागाची उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sai tamhankar revealed she invited sonalee kulkarni for lunch but made dinner rnv

First published on: 25-07-2023 at 18:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×