सई ताम्हणकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने मराठीसह हिंदी सिनेविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सई तिच्या ‘द इलेव्हन्थ प्लेस’ या नव्या घरामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. याशिवाय सईने नुकतंच तिचं नवीन यु-ट्यूब चॅनेलही सुरू केलं आहे. यानिमित्ताने तिने अलीकडेच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ सेशन घेतलं.

हेही वाचा : “मी चांगल्या कामाच्या शोधात…” प्रसिद्ध मराठी अभिनेता काम मिळवण्यासाठी करतोय धडपड, म्हणाला “प्रामाणिक प्रयत्न…”

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?

‘आस्क मी’ सेशनमध्ये सईने तिच्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. “सईची पहिली ऑडिशन कशी होती?”, “तिने नवीन घर का घेतलं?” असे अनेक प्रश्न अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी विचारले होते. अभिनेत्रीने या सगळ्या प्रश्नांना हटके उत्तरं दिली आहेत.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने ‘या’ लोकप्रिय मालिकेत घेणार एन्ट्री, पहिला लूक आला समोर

सईच्या एका चाहत्याने तिला “तुझा आवडता क्रिकेटर कोण आहे?”, असा प्रश्न विचारला. यावर “जिजाजी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी” असं उत्तर तिने दिलं. भारतील फलंदाज विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री असल्याने कोहलीला कलाविश्वातील सगळेच कलाकार ‘जिजू’, ‘जिजाजी’, ‘बॉलीवूडचा जावई’ म्हणून संबोधतात.

हेही वाचा : सायली-अर्जुन पुन्हा करणार लग्न! पूर्णा आजीमुळे घेणार मोठा निर्णय, ‘ठरलं तर मग’चा नवीन प्रोमो आला समोर…

दरम्यान, सई ताम्हणकरच्या कामाबद्दल सांगायचं, तर लवकरच ती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या नव्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी तिने ‘मिमी’, ‘गजनी’,‘हंटर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकाल्या होत्या. ‘मिमी’साठी सईला मानाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.