मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या स्पेनमध्ये व्हेकेशन एंजॉय करत आहे. तिने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्पेनमधील काही खाद्यपदार्थांचे फोटो पाहायला मिळत आहे. यामध्ये हिरव्या मिरच्यांचाही एक फोटो आहे. या फोटोंवर नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत.

सई ताम्हणकर बॉयफ्रेंड अनिश जोगबरोबर फिरतेय स्पेन; ‘त्या’ एका फोटोने उलगडलं गुपित

सईने ‘तिखट गोड स्पेन’ असं कॅप्शन देत तिने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोन फोटोंमध्ये तळलेल्या हिरव्या मिरच्यांचा एक पदार्थ दिसत आहे, त्याला ‘शिशितो पेपर्स’ असं म्हणतात. तर एका फोटोमध्ये ‘चुरोज व डार्क चॉकलेट’ दिसत आहेत. सईने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी भन्नाट कमेंट्स करत आहेत.

‘महाराष्ट्रात वडापाव सोबत मिरच्या फुकट मिळतात’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
sai tamhankar post comments
सई ताम्हणकरच्या पोस्टवरील कमेंट्स

अनेकांनी ‘शिशितो पेपर्स’ म्हणजे तळलेल्या मिरच्या असं समजून कमेंट्स केल्या आहेत. चुरोज व डार्क चॉकलेटला ही चकली आहे का? असं विचारलंय.