मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपट ३० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. तर जिनिलीया देशमुखने ‘वेड’मधून तब्बल दहा वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची क्रेझ काही केल्या कमी होत नाही आहे.

रितेश-जिनिलीयाच्या या चित्रपटाप्रमाणेच त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटातील ‘वेड लावलंय’, ‘सुख कळले’ गाण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ‘वेड’ चित्रपटातील ‘सुख कळले’ गाणं गात असलेल्या मुलीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जुही सिंग या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>>नाना पाटेकरांवर जडलेलं मनीषा कोईरालाचं प्रेम; पण अभिनेत्याला दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर रुममध्ये पाहिलं अन्…

रितेश देशमुखने या मुलीचा व्हिडीओ रिट्वीट करत “तू मस्त गायली आहेस जुही”, असं म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही या मुलीच्या गाण्याची भूरळ पडली आहे. राऊतांनीही “वेड…लागले…”  असं म्हणत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा>> ‘पठाण’ हे देशाचं यश आहे म्हणणाऱ्याला शाहरुख खानने दिलं उत्तर, म्हणाला “हिंदुस्तान…”

हेही वाचा>> Video: १० डिग्री तापमान अन् वाळंवटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘सैराट’, ‘लय भारी’ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आत्तापर्यंत ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५७ कोटींची कमाई केली आहे.