अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. मे महिन्यात दोघेही परदेश दौऱ्यावर गेले होते. दोघांनी त्यांच्या स्पेन आणि फ्रान्स ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. सिद्धार्थ-मिताली दरवर्षी विविध ठिकाणी फिरायला जातात. नुकतीच मिताली थायलंड फिरायला गेली आहे. परंतु, यावेळी ती वैयक्तिक कामानिमित्त एकटीच थायलंडला गेली आहे. मितालीने या ट्रीपदरम्यानचा शेअर केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा : “जेव्हा जातीनिहाय आरक्षण देण्याचा प्रश्न येतो…”, शरद पोंक्षेंनी शेअर केलं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं भाषण

मिताली या व्हिडीओमध्ये हॉटेलच्या रुममध्ये कंटाळून एकटीच झोपल्याचं दिसत आहेत. “जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात असता आणि तुम्हाला आजारपण, एकटेपणा, कंटाळा जाणवतो आणि काहीचं नीट होतं नसतं. तेव्हा चांगले पदार्थ खाऊन तुम्ही आनंदी होता.” असं अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : फुडी आत्मा: जिव्हा करा रे प्रसन्न!

बायकोने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने खास कमेंट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘डोलो घे बाळा एक!’ अशी कमेंट सिद्धार्थने मितालीच्या व्हिडीओवर केली आहे. यावर “तू इथे ये…” असे मितालीने म्हटले आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “तुला घरच्या वरण-भाताची आठवण येत आहे ना…” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : मराठी भाषेला कुठेच प्राधान्य मिळत नाही! दिग्दर्शक, अभिनेते हृषिकेश जोशी यांची खंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘शंभर समस्यावर एक उपाय’ असं कॅप्शन मिताली मयेकरने या व्हिडीओला दिलं आहे.