‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून सर्वांच्या भेटीला आलेला टिकटॉक स्टार म्हणजे सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. सूरजनं बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी जिंकत विजेतेपद पटकावलं होतं. या विजेतेपदाबरोबरच त्याला मराठी चित्रपटाची ऑफर मिळाली. शोच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी त्याच्या ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाची घोषणा केली होती. येत्या २५ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त सूरजसह संपूर्ण टीम प्रमोशन करताना दिसत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटासाठी अनेक चाहते मंडळी उत्सुक आहेत. तसंच काही कालकारही त्याच्या चित्रपटासाठी उत्सुक असून त्याला पाठींबा देत आहेत. अशातच गौतमी पाटीलनेही सूरजला त्याच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर गौतमीने चित्रपटातील ‘झापुक झुपूक’ या गाण्यावर रील शेअर करत सूरजचा हा चित्रपट पाहण्याचे आवाहनही केलं आहे.

सूरजच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटातील एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच गाण्यावर गौतमीने रील व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच खास व्हिडीओ शेअर करत तिने असे कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “२५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या तुझ्या ‘झापुक झुपूक’ पिक्चरसाठी खूप खूप शुभेच्छा. आता सगळ्यांनी सूरजच्या ‘झापुक झुपूक’ या गाण्यावर नक्की रील्स बनवा! एकदम गुलीगत… आणि हो पिक्चरला गर्दी करा.”

त्याचबरोबर व्हिडीओद्वारे तिने असं म्हटलं आहे की, “नमस्कार मी गौतमी पाटील. आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाणचा एक चित्रपट येतो आहे आणि या चित्रपटातील त्याचं ‘झापुक झुपूक’ हे गाणं आलं आहे. तर सर्वांनी भरभरून प्रेम द्या. तुम्ही सर्व सूरजचा प्रेम देतच आहात. तरीही मी जशी रील बनवली आहे तशी तुम्हीही बनवा आणि गाण्याला व त्याच्या चित्रपटालादेखील खूप खूप प्रेम द्या.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतमीच्या या व्हिडीओवर सूरजनेही प्रतिक्रिया व्यक्त करत ‘तिला धन्यवाद म्हटलं आहे. व्हिडीओखाली कमेंट्समध्ये सूरजने असं म्हटलं आहे की, “ताई खूप खूप आभार… असाच सपोर्ट करा. एकदम झापुक झुपूक”. दरम्यान, चित्रपटात सूरजसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.