अभिनेत्री तेजश्री प्रधान(Tejashri Pradhan) ही तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. मालिका व चित्रपटांतील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसते. तिने साकारलेल्या भूमिका वर्षानुवर्षे लक्षात ठेवल्या जातात. नुकतीच अभिनेत्रीने ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावेंनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्याचे दिसले. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला रेडिओ सिटीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. आता मात्र तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

आपण नॉनस्टॉप…

अभिनेत्री तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर छाया कदम यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्यांच्या हातात त्यांना दिलेले अवॉर्ड दिसत आहेत. याबरोबरच दोन्ही अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. काही फोटोंमध्ये त्या खळखळून हसताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना तेजश्रीने लिहिले, “पुन्हा एकदा प्रेमाची ‘हाजरी’. आपण नॉनस्टॉप आहोत.” तिच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी अभिनंदन असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. या सगळ्यात छाया कदम यांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. अभिनेत्री छाया कदम यांनी लिहिले, “त्या दिवशीची तुझी भेट म्हणजे माझ्यासाठी सरप्राइज गिफ्ट होतं. आपण वेडेपणाचा कहर केला. लव्ह यू”, असे म्हणत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावर तेजश्रीने उत्तर देत म्हटले, “मलाही असेच वाटत आहे.” छाया कदम व तेजश्री प्रधान यांनी हाजरी या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

छाया कदम यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता नुकताच त्यांना पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. स्नो फ्लॉवरसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याचे पाहायला मिळाले. कान्स पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या ‘ऑल वी इमॅजिन इज लाईट’ या चित्रपटाला गौरविण्यात आले होते, त्यावेळी त्या मोठ्या चर्चेत आल्या. याबरोबरच, त्यांच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील भूमिकेचेदेखील मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. आता आगामी काळात त्या कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेजश्री प्रधान ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘ती सध्या काय करते’, ‘लग्न पाहावे करून’, ‘पंचक’, ‘झेंडा’ यांसारख्या मालिका आणि सिनेमांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. याबरोबरच, ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तिने मुक्ता ही भूमिका साकारली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने मालिका सोडली आहे. आता पुढे ती कोणत्या चित्रपट किंवा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.