छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पराक्रम आज फक्त देशातच नव्हे तर जगभरातील लोकांना आता माहिती झाला आहे. छत्रपतींच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारा हर हर महादेव चित्रपट आता अवघ्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन करण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे यांनी दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांची भेट घेतली. यावेळी नागार्जुन यांच्या हस्ते तेलुगू चित्रपटातील पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

या चित्रपटाच्या पोस्टरचे कौतूक करणार नागार्जुन यांचा व्हिडीओ झी स्टुडिओने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात ते असं म्हणाले आहेत की. ‘मला खूप आनंद होत आहे की मी या पोस्टरचे प्रकाशन करत आहे, मी लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आहे. इतक्या महान राजाची गोष्ट आता तेलगू भाषिकांना या चित्रपटातून कळणार आहे’. या व्हिडीओमध्ये त्यांनी पुढे चित्रपटाचे आणि चित्रपटातील कलाकारांचे, दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे.

Photos: फक्त सलमान खानच नव्हे तर ‘या’ बॉलिवूड कलाकारांनीही केलं ‘बिग बॉस’चं सुत्रसंचालन, पण भाईजानच ठरला सरस

हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व असलेल्या बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. नागार्जुन यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हर हर महादेव या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे हे कलाकार झळकणार आहेत. येत्या दिवाळीत म्हणजे २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.