‘टाईमपास’ चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला. या चित्रपटामुळे त्याला ‘दगडू’ ही वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर प्रथमेशने अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केलं. अशातच मध्यंतरी प्रथमेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रथमेशने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती.

गेल्यावर्षी दिवाळीनिमित्त प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर खास फोटोशूट केलं होतं. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर यावर्षीच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रथमेशने अखेर आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली. आज प्रथमेशचा वाढदिवस असल्याने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजाने प्रथमेशबरोबरचा खास व्हिडीओ शेअर करत त्याच्यासाठी एक रोमँटिक पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा : साखरपुड्याच्या घोषणेनंतर पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा! नावंही आलं समोर

क्षितिजा या पोस्टमध्ये लिहिते, “हॅलो प्रथमेश…माझ्या आयुष्यातील तुझं स्थान खरंच खूप महत्त्वाचं आहे. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून प्रत्येक गोष्ट सुंदर झाली. मी खरंच नशीबवान आहे म्हणून मला तुझ्यासारखा काळजी करणारा, गोड जोडीदार मिळाला. प्रथमेश तू खरंच भारी आहेस! आपल्यामधील हे घट्ट नातं असंच कायम राहावं एवढीच इच्छा… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! भविष्यात येणारे वाढदिवस सुद्धा असेच तुझ्याबरोबर साजरे करण्यासाठी मी उत्सुक आहे….सगळ्यात महत्त्वाचं आय लव्ह यू प्रथमेश.”

हेही वाचा : ‘झिम्मा २’ फेम सायली संजीव नाटकात काम का करत नाही? अभिनेत्री म्हणाली, “दिग्दर्शक-निर्मात्यांना माझ्यामुळे…”

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar Parab (@miles_in_style)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, क्षितिजाने वाढदिवशी केलेल्या या पोस्टमुळे प्रथमेश व क्षितिजाच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. क्षितिजाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत प्रथमेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.