लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाच वातावरण आहे. या काळात बाप्पाची बरीच गाणी ऐकायला मिळतात. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून एक गाणं जे सतत ऐकायला येतं आणि ते भविष्यातही ऐकलं जाईल ते गाणं म्हणजे ‘तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता’. लोकगायक, स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे. याच लोकप्रिय गाण्याच्या निमित्ताने गायक, अभिनेता उत्कर्ष शिंदेने आजोबा प्रल्हाद शिंदेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा – “स्वामींची शक्ती विलक्षण आहे”; अभिनेत्री अमृता खानविलकरने सांगितला स्वामी समर्थांचा अनुभव, म्हणाली, “ज्यांना आयुष्यात…”

उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. नेहमी कोणत्या ना कोणत्या कलाकाराविषयी किंवा विविध विषयावर पोस्ट करत असतो. आज त्याने आजोबा प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – “पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला अन्…” अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला विमानातला अनुभव, म्हणाला…

प्रल्हाद शिंदे यांचा ‘तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता’ गाणं गातानाचा दुर्मिळ व्हिडीओ शेअर करत उत्कर्षनं लिहीलं आहे की,” ‘देवाला आवडणारा आवाज’ तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता…आज सकाळीच हे गाणं ऐकून झालं. गणपतीचा माहोल बनवायचा म्हटलं की, हे गाणं तर झालंच पाहिजे. कैकदा भेटणारे चाहते या गाण्याच्या आठवणी सांगतात. आमच्‍या लहानपणी आमच्‍या कोकणात घरासमोर झाडांच्‍या बागा आवतीभवती रान घनदाट झाडी आणि मग दूरवर दुसरं घर. पण यात सुद्धा सण आला की, सर्वांना एकत्रित करणारा एक आवाज कानी पडायचा, तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, आता तरी देवा मला पावशील का?, ते ऐका सत्यनारायणाची कथा. पिढ्यानपिढ्या जिवंत असलेला हा आवाज आज ही यूट्युब, इन्स्टा रील्समधून युवा पिढीला भूरळ घालतोय.”

हेही वाचा – अभिनेता शशांक केतकरची गणरायाकडे ‘ही’ मागणी; म्हणाला, “माझ्या मुलासाठी…”

“प्रल्हाद शिंदेंच्या गाठीशी पैसा, अवार्ड जरी कमी आला असला, तरीही सर्व जाती धर्मातील प्रेक्षकांचं प्रेम हे सर्वात जास्त लाभलेले त्यांच्या सारखे बोटावर मोजण्या इतकेच असतील. या गळ्याने शास्त्रीय बाज जरी जपला नसला तरी वंश परंपरागत गळ्यातून येणारा करेक्ट सूर मात्र त्यांनी सांभाळला होता. मानवी मनाला आध्यात्माकडे खेचून आणणार हा आवाज. घरातले सासू सुनेचे वाद असो किंवा नात्यांची गमत सांगणार गाणं असो. लोकगीतांचे सामने ते रेकॉर्ड ब्रेक करणारी वैविध्यपूर्ण अशी गाणी. त्यांच्याबरोबर काम केलेली मंडळी सांगतात वरच्या पटीत गातांना जिथे इतर गायकांचा श्वास आवाज संपायचा तिथे प्रल्हाद शिंदेंची तान सुरू व्हायची. लहानग्यांपासून ते वयोवृद्धनाही आपलासा वाटणारा हा आवाज. मेळ्यात,चौकात, बाजारात, भजनात, पारायणात, सप्‍ताहात ते घरातील देवघरात जाऊन पोहोचलेला प्रल्हाद शिंदेंचा हा आवाज जो अजरामर होता, आहे आणि राहील,” असं उत्कर्षनं लिहीलं आहे.

हेही वाचा – “चार दिवसांपूर्वी आमच्याकडे खूप वाईट गोष्ट घडली…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला प्रसंग; म्हणाली…

दरम्यान, उत्कर्षच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो बिग बॉस मराठीमुळे अधिक प्रकाश झोतात आला. आता तो लवकरच लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वीर सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे.

Story img Loader