Varsha Usgaonkar on her career in marathi industry: अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान महत्त्वाचे मानले जाते. त्यांना वंडरगर्ल म्हणूनही संबोधले जाते. अनेकदा त्या त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

“‘गंमत जंमत’नंतर मला…”

वर्षा उसगांवकर यांनी ‘लोकमत फिल्मी’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत वर्षा उसगांवकर म्हणालेल्या की, मराठी चित्रपटसृष्टीत माझं एक वेगळं स्थान निर्माण झालं आणि त्याचं श्रेय मी सतीश कुलकर्णी यांना देईन. त्यांनी मला वंडरगर्ल, अशी ओळख दिली. ‘गंमत जंमत’नंतर मला ज्या भूमिका मिळाल्या, त्या भूमिका स्त्रीप्रधान होत्या. मला ओळख मिळाली त्याचं हे एक कारण असावं.”

अशोक व लक्ष्या यांची मोठी लोकप्रियता होती. पण, मी विचार करून भूमिका निवडल्या. ‘पसंत आहे मुलगी’, ‘रेशीमगाठी’, ‘खट्याळ सासू नाटाळ सून’, ‘यज्ञ’, ‘पैंजण’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ हे सगळे चित्रपट अभिनेत्रीकेंद्रित होते. या चित्रपटातील भूमिका साकारताना मला माझं अभिनय कौशल्य दाखवता आलं आणि त्यामुळे माझं वेगळं स्थान निर्माण झालं,” असेही त्या म्हणाल्या.

“एकेकाळी मला नंबर वन हिरोईन, असं म्हणायचे. लोक अनेकदा असेही म्हणायचे की, ती मराठी चित्रपटांतील श्रीदेवी आहे किंवा माधुरी दीक्षित आहे. अर्थात, लोकांनी त्या उपाध्या दिल्या. पण, मी वर्षा उसगांवकर आहे आणि मला हेच नाव सांगायला आवडतं. मी ना श्रीदेवी आहे ना माधुरी दीक्षित; मी वर्षा उसगांवकर आहे. मराठी चित्रपटसृष्टीत माझं एक वेगळं स्थान निर्माण झालं. त्यासाठी मी चित्रपटांच्या लेखकांची ऋणी आहे. अर्थात, सगळ्यात आधी देवाची ऋणी आहे.”

वर्षा उसगांवकर असेही म्हणालेल्या की, सिनेमात मला पुढे आणण्यात स्वर्गीय दामू केंकरे यांचा वाटा आहे. त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यांनी मला ‘कार्टी प्रेमात पडली’ या नाटकात काम दिलं. ते माझं पहिलं नाटक होतं. त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे होता. लक्ष्या त्या नाटकातून स्टार झाला. त्यानंतर मी ‘ब्रह्मचारी’ सिनेमात काम केलं.

“स्वर्गीय सुधीर भट यांनी ‘ब्रह्मचारी’ सिनेमाची जाहिरात करताना सगळ्या कलाकारांची मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं की, मी तिचं नाव ‘…आणि वर्षा उसगांवकर’ असं देणार आहे. जसं आणि काशिनाथ घाणेकर असतं. तसेच सतीश कुलकर्णींनी वंडरगर्ल गंमत जंमतमध्ये माझं नाव वर्षा उसगांवकर असं दिलं. या दोन माणसांची मी ऋणी आहे. त्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून मी नाट्यशास्त्राचा कोर्स केला. तिथे लक्ष्मणराव देशपांडे होते. त्यांना मी गुरू मानते. या सगळ्या लोकांनी मला प्रोत्साहन दिलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातदेखील सहभागी झाल्या होत्या. त्या चित्रपटांसह मालिकांतदेखील काम करताना दिसतात. आगामी काळा