मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये केदार शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केदार शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच केदार शिंदे यांनी लग्नाला २६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पत्नी बेला शिंदेसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी स्वत:चा आणि पत्नीचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो फार जुना असल्याचे दिसत आहे. यात केदार शिंदे हे पत्नीच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपल्याचे दिसत आहेत. तर त्यांची पत्नी ही बाहेर काहीतरी बघत असल्याचे या फोटोतून दिसत आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या फोटोला त्याने खास कॅप्शन दिले आहे.

‘बॉलिवूडला मी परवडणार नाही’ असे म्हणणारा अभिनेता महेश बाबू एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो? जाणून घ्या

केदार शिंदेंची खास पोस्ट

“आज आपल्या लग्नाला २६ वर्ष पूर्ण झाली. खरतर तू पळून जाऊन लग्न करण्याच्या निर्णयाला होकार दिलास, तेव्हा या क्षेत्रात मी धडपड करत होतो. तुझं आयुष्यात येण माझ्यासाठी भाग्यशाली ठरलं. म्हणजे एकाच रात्रीत आकाशाला हात लागले असं नाही. मात्र एक दिशा मिळाली पुढच्या प्रवासाची. आजही आपण धडपडतोच आहोत. स्वामी कृपेने दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था चोख आहे.

मात्र, तुझी खूप स्वप्न पूर्ण करण्यात मी तोकडाच पडतोय. माझा ECG सारख्या करीयर ग्राफ! तू नेहमीच प्रत्येक चढ उतार क्षणी,साथ देतेयसं!! स्वामी म्हणतात “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” आणि तुझं म्हणणं असतं “मी तुझ्या सोबत आहे”. तुम्हा दोघांच्यामुळेच मी पुढची वाटचाल करणार आहे. मला “सना” सारखं गोड स्वप्न प्रत्यक्षात दिलस. तुम्हा दोघांसाठीच आयुष्यभर जगेन, धडपडेन…..”, असे केदार शिंदेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘केजीएफ २’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज का दिला नाहीस? श्रेयस तळपदे म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान केदार शिंदे आणि बेला शिंदे या दोघांचाही प्रेमविवाह झाला आहे. गेल्यावर्षी ९ मे २०२१ मध्ये त्यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ते दोघे पुन्हा एकदा लग्नबेडीत अडकले होते. त्यांच्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.