मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. त्याच्या गाण्यामुळे त्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहुर्तावर त्याने नवीन बुलेट खरेदी केली आहे. त्याबद्दल त्याने एक खास पोस्ट ही शेअर केली आहे.

अवधूत गुप्ते हा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो रॉयल इन्फिल्डची नवीकोरी बुलेट खरेदी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याला voyage motors ची महाराष्ट्रातील पहिली बुलेट मिळाली आहे.
आणखी वाचा : अवधूत गुप्ते लवकरच करणार राजकारणात प्रवेश, घोषणा करत म्हणाला “माझा हेतू…”

“मित्रा.. तुला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! बघ मला ह्या शुभमुहूर्तावर काय गोड बक्षिस मिळालंय!! @royalenfield ने #supermeteor650 चं बुकिंग ओपन करताच मी बुकिंग केलं आणि @voyagemotorsre ला गळ घातली की, महाराष्ट्रातली पहिली #bullet मला हवी!! आणि गंमत बघ.. #royalenfield ने सुद्धा माझी प्रेमाची विनंती मान्य केली!! ‘बुरुम बुरुम‘ ला मिळालेला हा सर्वात मोठा पुरस्कार आहे, असं मी मानतो! थॅंक्यू @royalenfield आणि थॅंक्यू @voyagemotorsre !!”, असे अवधूत गुप्तेने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

आणखी वाचा : “मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अवधूत गुप्ते हा लवकरच राजकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने याबद्दलची घोषणा केली आहे. अवधूत गुप्ते हा फक्त पाच वर्षासाठी राजकारणात येणार असला तरी तो कधी राजकारणात येणार याबद्दल त्याने काहीही सांगितलेले नाही. त्याबरोबरच अवधूत गुप्ते कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश घेणार, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.