रवींद्र पाथरे

दिग्दर्शक विजय केंकरे यांचा झुकाव विनोदी, फार्सिकल आणि रहस्यमय नाटकांकडे अधिक आहे हे अधोरेखित करणारी अलीकडची त्यांची काही नाटकं म्हणता येतील. त्यातही रहस्यनाटयाची हाताळणी करण्यात त्यांना जास्तच रस दिसतो. नुकतंच रंगमंचावर आलेलं प्रकाश बोर्डवेकर लिखित, सुरेश जयराम रंगावृत्तीत ‘मास्टर माइंड’ हे नाटकही याचंच वानगीदाखल उदाहरण. ‘अस्मय थिएटर्स’ची ही निर्मिती आहे.

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!

रश्मी नावाची स्त्री मॉलमध्ये खरेदी करायला जाते आणि काऊंटरवर पैसे द्यायला गेल्यावर तिच्या लक्षात येतं की आपलं पाकीट मारलं गेलंय. आता करायचं काय? एवढयात एक तरुण पुढे होऊन तिचं बिल भरतो आणि तिची त्या पेचातून सुटका करतो. मग ती त्याला घरी सोडण्याची ऑफर देते आणि त्याला त्याच्या घरी सोडते. कार्डने आपण त्याचं पेमेंट करू असं ती त्याला सांगते. तोही त्यास होकार भरतो. आणि आलाच आहात तर ड्रिंक वगैरे घेणार का, वगैरे तिला विचारतो. तीही बीअर घेईन म्हणते आणि दोघं ड्रिंक घेतात. तिची अस्वस्थ मन:स्थिती त्याच्या लक्षात येते. तो तिला खोदून खोदून विचारतो- ‘काय प्रॉब्लेम आहे?’ ती आधी त्याला थातुरमातुर उत्तरं देते. पण तो हट्टालाच पेटतो तेव्हा ती आपल्या नवऱ्याचा एक प्रॉब्लेम झाल्याचं त्याला सांगते. तो व्यवसायात गोत्यात आलेला असतो आणि त्यामुळे सदानकदा चिडलेला असतो. त्यात मध्यंतरी त्याच्या ऑफिसमध्ये चोरीही होते. सगळं सामान लुटलं गेलेलं असतं. त्यामुळे त्याचा सगळा राग, त्रागा तो बायको आणि मुलगी मनूवर काढत असतो. तशात त्याचं त्याच्या सेक्रेटरीबरोबर अफेअरही सुरू असतं. जिचा मध्यंतरी खून झालेला असतो. या सगळ्या गोष्टींमुळे रश्मी अस्वस्थ असते. तो तरुण यावर, तुला नवऱ्याला धडा शिकवायचाय का, असं विचारतो. पण ती त्यास तयार नसते. मात्र, हळूहळू बोलता बोलता तिला त्याच्यापासून सुटका हवी आहे हे त्याच्या लक्षात येतं. तो तुझ्या नवऱ्याचा काटा काढायचाय का, असं थेटपणे तिला विचारतो. ती ‘हो’, ‘ना’ करता करता एकदाची कबूल होते. पण हे आपल्या समोर करायचं नाही असंही त्याला बजावते. आपण त्यात अडकता कामा नये असं तिचं म्हणणं असतं. तो एका फ्रॉडमध्ये दहा वर्षे जेलमध्ये जाऊन आल्याचं तिला त्याच्याशी बोलताना कळलेलं असतं. त्यामुळे तो हे काम निश्चितच करू शकेल याची खात्री तिला पटते. ती त्याला नवऱ्याला मारण्याची ऑफर देते..

हेही वाचा >>> चांदवडचे शेतकरी महिला अधिवेशन

पुढे काय होतं, हे प्रत्यक्ष नाटकातच बघणं इष्ट.

सर्वसाधारणत: ज्यांच्यावर संशय येणार नाही असं वाटतं तेच पुढे गुन्हेगार निघतात, हा सगळ्याच रहस्यनाटयांतील फंडा असतो. यातही तेच होतं. पण ते कसं, हे इथं सांगून उपयोगी नाही. त्यासाठी नाटक बघणंच योग्य.

प्रकाश बोर्डवेकर लिखित आणि सुरेश जयराम रंगावृत्तीत ‘मास्टर माइंड’मध्ये प्रत्यक्ष खून होताना दिसत नाही, तरी त्याचा प्लॉट मात्र आखला जातो. गुन्हा करणारा आणि त्याच्या हातून ते करवून घेणारा यांचा ‘माइंड गेम’ हा या नाटकाचा प्राण आहे. तो या दोनच पात्रं असलेल्या नाटकात छानपैकी रंगवलाय. साहजिकपणेच नाटक शब्दबंबाळ झालंय. भावभावनांचे खेळ, परस्परांवर कुरघोडी, भीती, दहशत याही क्लृप्त्या नाटकात योजल्यात. एका खुनाची गोष्ट यात दाखवलेली असली तरी त्या पॉइंटपर्यंत संबंधित कसकसे येतात, हा यातला खिळवून ठेवणारा भाग आहे. सुरेश जयराम यांनी तो प्रेक्षकाला कसं बांधून ठेवेल याची दक्षता घेतली आहे. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नाटक शब्दबहुल आहे हे लक्षात घेत त्यात अल्प, स्वल्प विरामांच्या जागा, संघर्षबिंदू, भावभावनांचे आंदोळ यांचा मुक्त हस्ते वापर करत प्रेक्षक नाटकातून बाहेर येणार नाहीत हे पाहिलं आहे. दोनच पात्रांचं नाटक असल्याने हे खरं तर आणखीनच कठीण काम. परंतु केंकरे यांनी ते लीलया जमवून आणलं आहे. पात्रांच्या हालचाली, त्यांचे एकमेकांबद्दलचे आडाखे, समज-गैरसमज, त्याचे परिणाम यांचा यथायोग्य वापर करत त्यांनी हे रहस्यनाटय विणलं आहे. म्हणूनच ते रसिकांना खिळवून ठेवतं.

प्रदीप मुळ्ये यांनी गावाबाहेरचा पडका बंगला त्यातल्या तपशिलांसह नेमकेपणाने उभा केला आहे. त्या तरुणाचं नुकतंच त्यात राहायला येणं प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक त्या चीजा बंगल्यात दिसतात. शीतल तळपदेंनी प्रकाशयोजनेतून परस्पर कुरघोडीचं पात्रांमधील राजकारण ठळक केलं आहे. अशोक पत्की (संगीत) आणि अनुराग गोडबोले (पार्श्वसंगीत) यांनी यातील रहस्याच्या नाटयपूर्णतेत भर घातली आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषाही नाटयात्म घटनांना पूरक अशीच.

आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांची जोडी याआधीही  नाटकात जमलेली असल्याने त्यांची केमिस्ट्री छान जमून आलीय. आस्ताद काळे यांचं मधूनच व्हिम्झिकल वागणं, बोलणं त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीला साजेसं. त्यांतून नाटकातील रहस्य अधिकाधिक गडद होत जातं. रश्मीला ‘ट्रॅप’ करण्याचे त्याचे फंडे आणि त्यातून सुटकेचे तिचे प्रयत्न यामुळे नाटकाची रंगत उत्तरोत्तर वाढत जाते. उत्तरार्धात बाजी पलटते. रश्मी झालेल्या अदिती सारंगधर नवऱ्याच्या जाचाने कंटाळलेली, त्याच्या पकडीतून सुटू पाहणारी, पण त्याला न कळता, आपण कुठंही न अडकता त्याचा काटा निघेल तर बरं असं वाटणारी स्त्री तिच्या भावनिक, मानसिक आंदोलनांसह उत्तमरीत्या वठवलीय. ती खेळत असलेला माइंड गेम समोरच्याच्या लक्षात येणार नाही याची ती घेत असलेली खबरदारी.. डाव पलटवण्याची तिची विलक्षण खेळी त्यांनी कठोरतेनं राबवलीय. एक बांधून ठेवणारं रहस्यनाटय असं ‘मास्टर माइंड’चं वर्णन करायला हरकत नाही.