देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमण ओळखला जातो. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद आज फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. मिलिंदचे लाखो चाहते आहेत. मिलिंद बऱ्याच वेळा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. दरम्यान, मिलिंदने नुकताच एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

हे फोटो आणि व्हिडीओ मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मिलिंद शर्टलेस दिसतं आहे. तर, व्हिडीओत मिलिंद पुशअप्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत मिलिंदने ४० पुशअप केले आहेत. “जेव्हा मी म्हणतो की मला दिवसभर व्यायाम करायला वेळ मिळाला नाही, तर मी त्यातून १ मिनिट तर नक्कीच काढू शकतो!,” असे मिलिंद म्हणाला.

आणखी वाचा : ‘अमृताला कानशिलात लगावली मला त्याच वाईट वाटतं नाही’, इशा देओलने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बऱ्याच वेळा मला तेच पाहिजे – ६० सेकंदात किती? वेळ मिळत नाही, जागा नाही, उपकरने नाही हे कारण नाही, तुमच्या शरीराचे वजन उचलण्यासाठी सक्षम असणे पुरेसे आहे. एका मिनिटात पुशअपची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही ध्येयाची ही चांगली सुरुवात असते,” अशा आशयाचे कॅप्शन मिलिंदने दिले आहे.

आणखी वाचा : Video : दोन महिन्यानंतर जुही घरी परतल्यानंतर मुलीने दिली अशी प्रतिक्रिया

दरम्यान, मिलिंद सोशल मीडियावर नेहमीच फिटनेसचे व्हिडीओ शेअर करतो. मिलिंद ५५ वर्षांचा असून ही एवढा फिट आहे. त्याला पाहून फिट राहण्याची प्रेरणा अनेकांना मिळते असे त्याचे चाहते नेहमीच म्हणतात.