छोट्या पडद्यावरील मालिकांपासून ते बॉलिवूड पर्यंत मजल मारलेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायमच चर्चेत असते. नुकतीच मौनी तिच्या एका वायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. बॅकलेस ड्रेस परिधान केल्यामुळे मौनीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.

वायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मौनी रॉयने बॅकलेस ड्रेस परिधान केल्याच दिसतंय. तसंच ती रस्त्यांमधून पळताना दिसतेय. मौनी पळत जाऊन तिच्या गाडीत बसते यावेळीच तिच्यासोबत उप्स मुमेंट घडली आहे. हे दृश्य कॅमेर्‍यात कैद झालं. त्यानंतर पुन्हा पुढे मौनी फोटोग्राफर्सना पोज देताना दिसतेय. मात्र यावेळी देखील ती तिच्या ड्रेसमुळे कम्फर्टेबल नसल्याचं दिसून येतंय. ती सतत हाताने ड्रेस सावरत असल्याचं दिसतंय. मौनीने परिधान केलेल्या ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. सेलिब्रिटी फोटोग्रफर विरल भयानीने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

बॅकलेस ड्रेसवरून मौनी रॉयला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. एक नेटकरी म्हणाला, “एकीकडे हातांनी झाकतेय तर दुसरीकडे केसांनी. कम्फर्टेबल नसताना असे ड्रेस का घालायचे?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ही स्वतःला करीना कपूर समजते का?” आणखी एक नेटकरी म्हणाला, “जर तू कम्फर्टेबल नाही तर असे कपडे का घालायचे?”

आणखी एक युजर कमेंट करत म्हणाला, “दिखाना भी नही आता छुपाना भी नही आता”. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत मौनी रॉयला तिच्या बॅकलेस ड्रेसवरून ट्रोल केलं आहे. याआधी देखील मौनीला झिरो फिगरवरून तसंच बोल्ड फोटोशूटवरून ट्रोल करण्यात आलं आहे.

mouni-roy

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवों के देव महादेव’, ‘नागिण’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांनंतर मौनीने ‘गोल्ड’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात ती अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती.