scorecardresearch

Video: कार्यक्रमादरम्यान गरोदर सुनेची काळजी घेताना दिसले मुकेश अंबानी; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…

आकाश अंबानीची पत्नी व अंबांनींची मोठी सून श्लोका अंबानी दुसऱ्यांदा गरोदर आहे.

mukesh ambani shloka ambani video viral
मुकेश अंबानींचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतु, या सोहळ्यात अंबानींच्या मोठ्या सुनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आकाश अंबानीची पत्नी व अंबांनींची मोठी सून श्लोका अंबानी दुसऱ्यांदा गरोदर आहे.

श्लोका अंबानीचा कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या गरोदरपणाची सर्वत्र चर्चा आहे. याच दरम्यान मुकेश अंबानींचा या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंबानी त्यांच्या गरोदर सुनेची काळजी घेताना दिसत आहेत. इन्स्टंट बॉलिवूड या पेजवरुन अंबानींचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी व आकाश अंबानी गरोदर असलेल्या श्लोका अंबानीचा हात पकडून पापाराझींसमोर पोझ देताना दिसत आहेत. मुकेश अंबानींच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

हेही पाहा>> Photos: अंबानींच्या मोठ्या सुनेचं मॅटर्निटी फोटोशूट, श्लोका अंबानीने फ्लाँट केलं बेबी बंप, पाहा फोटो

अंबानींच्या या कार्यक्रमातील व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत मुकेश अंबानींचं कौतुक केलं आहे. “हे लोक सुनेवर किती प्रेम करतात. एकदम स्वत:च्या मुलीसारखं. नाहीतर काही लोक फक्त बोलतात. आणि सुनेला मुलीसारखी तर सोड सुनेसारखीही वागणूक देत नाहीत,” असं एकाने म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video: “ड्रेसमध्ये बसणार कशी?” भूमी पेडणेकरचा हटके ड्रेस पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न, ट्रोल करत म्हणाले “हॉलीवूड सेलिब्रिटी…”

mukesh ambani shloka ambani

“सासरा जेव्हा सुनेचा हात पकडतो तेव्हा ती घरची सून नाही तर मुलगी मानलेली असते,” अशी कमेंट एकाने केली आहे.

mukesh ambani shloka ambani

“क्युटेस्ट सासरे. हा व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी आलं” अशी कमेंटही केली आहे.

mukesh ambani shloka ambani

“मुकेश अंबानी किती साधे आहेत. आपल्या मुलांवर ते किती प्रेम करतात. मग मुलगा असो, सून किंवा जावई” असंही एकाने म्हटलं आहे.

mukesh ambani shloka ambani

‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ उद्घाटन सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी श्लोका अंबानीने स्कर्ट व टॉप असा पेहराव केला होता. यावेळी ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसून आली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 17:52 IST

संबंधित बातम्या