Mukund Phansalkar प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर ( Mukund Phansalkar ) यांचं निधन झालं आहे. मराठी प्रेक्षकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे मुकुंद फणसळकर यांची प्राणज्योत मालवली आहे. नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमांतून मुकुंद फणसळकर घराघरांत पोहचले होते. लोकप्रिय गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट लिहित मुकंद फणसळकर यांच्या निधनाची बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मुकुंद फणसळकर ( Mukund Phansalkar ) उपचार घेत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

नक्षत्रांचे देणे कार्यक्रमांतून घराघरांत पोहचले होते मुकुंद फणसळकर

मुकुंद फणसळकर ( Mukund Phansalkar ) यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी अनेक गाणी गायली आहेत. झी मराठीवरच्या नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमांतून ते घराघरांमध्ये पोहचले. त्याआधी स्मरणयात्रा नावाचा त्यांचा कार्यक्रमही गाजला होता. झी टीव्हीवरच्या सारेगमप या कार्यक्रमाचे ते पहिले विजेते ठरले होते. मुकुंद फणसाळकर यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी अनेक गाणी गायली आहेत. नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमामुळे ते चर्चेत आले होते. सुप्रसिद्ध भावगीत गायक अशी त्यांची ओळख होती. सुरैल गायकीने ते प्रेक्षकांची मनं जिंकत. त्यांच्या निधनानाचं वृत्त अनेकांच्या काळजाला चटका लावणारं ठरलं आहे. संगीतकार आणि गायक सलील कुलकर्णी यांनी आपल्या खास पोस्टमधून मुकुंद फणसळकर यांची आठवण सांगितली आहे.

सलील कुलकर्णींची पोस्ट काय?

अतिशय आवडता गायक, एकेक शब्द असा गायचा की कवीला सुद्धा नव्याने अर्थ उलगडावा. आम्ही शाळा कॉलेज मध्ये असताना ज्यांनी गायनाने..बोलण्याने भारावून टाकलं होतं. त्यातलं एक महत्त्वाचं नाव मुकुंद फणसळकर ( Mukund Phansalkar ). खूप खूप वाईट वाटलं.
प्रीतरंग , साजणवेळा , नॅास्टॅस्जिया सगळ्या मैफिली डोळ्यासमोर आल्या. एका गुणी आणि संवेदनशील माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यागराज खाडीलकर यांची पोस्ट काय?

..आणि आज तो गेला.. मुकुंद फणसळकर आणि माझी संगीत सेवा एकत्रच सुरू झाली.. आम्ही स्थापन केलेली स्वरांकित नावाची संस्था, जागतिक मराठी परिषदेची स्मरण यात्रा, हिंदी सारेगमप, अनेक अनेक रंगमंचीय कार्यक्रम.. रसिकांनी आम्हा दोघांनाही उमेदीचे तरुण गायक म्हणून मनापासून स्वीकारलं होतं!.. त्याचा नितळ, निर्दोष, तलम आवाज, सुरेल गळा आणि एकूणच संगीत, सिनेमा आणि साहित्य यातलं अफाट ज्ञान व माहिती, यामुळे तू रसिकांच्या आणि व्यक्तिशः माझ्या सदैव स्मरणात राहशील मित्रा.. आमच्या स्मरण यात्रेत..!!