Video : भव्यदिव्य सेट, डोळे दिपवणाऱ्या दृश्यांसह ‘कलंक’चा दमदार टीझर प्रदर्शित

‘कुछ रिश्ते कर्जो की तरह होते है, उन्हे निभाना नहीं चुकाना पडता है’

kalank
कलंक

आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘कलंक’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अवघ्या दोन मिनिटांच्या या टीझरमध्ये भव्यदिव्य सेट आणि डोळे दिपवणारी दृश्य पाहायला मिळतात. या टीझरला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मोठेमोठे महाल, कलाकारांची भारावून टाकणारी वेशभूषा आणि एकंदरीत सेट पाहता ‘कलंक’ची नेमकी कथा काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आणखीनच वाढते. या चित्रपटाची कथा काय आहे हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. चित्रपटाची कथा १९४०च्या दरम्यानची असल्याचं कळतंय. ‘कुछ रिश्ते कर्जो की तरह होते है, उन्हे निभाना नहीं चुकाना पडता है’, ‘जब किसी और की बरबादी अपनी जीत जैसी लगे, तो हमसे ज्यादा बरबाद और कोई नहीं इस दुनिया में,’ असे दमदार संवादसुद्धा या टीझरमध्ये आहेत.

माधुरी या चित्रपटात ‘बेगम बहार’च्या भूमिकेत आहे. तर आलिया भट्ट ‘रुप’ या राजकुमारीची भूमिका साकारत आहे. वरुण धवन जफरच्या भूमिकेत आहे. अत्यंत निर्भय आणि नेहमीच संकटाची दोन हात करायला तयार असणारा जफर असतो. सोनाक्षी ‘सत्या चौधरी’, संजय दत्त ‘बलराज चौधरी’ आणि आदित्य ‘देव चौधरी’च्या भूमिकेत आहे.

‘हा एक असा चित्रपट आहे, ज्यावर मी सर्वस्व झोकून काम केलं आहे. हा चित्रपट माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. असं स्वप्न ज्यावर त्यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काम केलं आहे. हे स्वप्न मी तेव्हा पूर्ण करु शकलो नाही. पण, त्या स्वप्नाला एक दिशा मात्र नक्की मिळाली आहे….’, असं लिहित करणनं या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. धर्मा प्रॉडक्शन्स निर्मित हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Multi starrer kalank teaser released transports to the bygone era

ताज्या बातम्या