आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दिकी. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या वक्तव्यामुळे. आता नवाजने मुंबईत नवे घर खरेदी केल्याचे समोर आले आहे. या आलिशान घरासोबतचा फोटो स्वत: नवाजुद्दीनने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नवाजुद्दीनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या आलिशान घराचा फोटो शेअर केला आहे. त्याचे हे घर मुज्फ्फरनगर येथील बुढानामधील घरासारखे असणार आहे. त्याने या नव्या घराचे नाव वडीलांच्या नावावरुन ‘नवाब’ असे ठेवले आहे. नवाजुद्दीनच्या वडीलांचे नाव ‘नवाबुद्दीन सिद्दीकी’ असे आहे. नवाजने या नव्या आलिशान बंगल्याला चारही बाजूने पांढरा रंग दिला आहे.
Video: हार्दिक पंडयानं आजीसह Srivalli गाण्यावर धरला ठेका; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या नवाजुद्दीन त्याच्या कामात व्यग्र आहे. तो लवकरच कंगनाच्या ‘टीकू वेड्स शेरु’ या चित्रपटात काम करत आहे. साई कबीर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये त्याच्या सोबतच अवनीत कौर दिसणार आहे. त्यानंतर नवाज ‘हीरोपंती २’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजने २०२२मध्ये त्याच्याकडे ४ ते ५ चित्रपट असल्याचे सांगितले होते.