बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाचा आज २९ वा वाढदिवस आहे. आलिया सध्या तिची आई आणि बहिन शाहीनभट्टसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. आलिया आणि रणबीर कपूर हे गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आलियाच्या वाढदिवसानिमित्ताने आलियाला रणबीरच्या आई आणि बहिणीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आलिसासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छआ दिल्या आहेत. तर रिद्धीमा कपूरने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रिद्धीमाने आलियाचा, आई नीतूचा आणि मुली अदारासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत माझ्या आलूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे कॅप्शन रिद्धीमाने दिले आहे. त्यांच्या या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायराच्या घरी आलिशान इलेक्ट्रिक कारचे आगमन, पाहा फोटो

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकताच, आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ प्रदर्शित झाला. हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरा येथील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला यांच्या भूमिकेत दिसत आहे.