गायिका फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्यात सुरू असलेल्या वादाची सध्या बरीच चर्चा आहे. नेहाने फाल्गुनी पाठकचे गाणे रिक्रिएट केल्यापासून अनेक मीम शेअर केले जात आहेत ज्यामधून नेहा कक्करची खिल्ली उडवली गेली आहे. याबाबत फाल्गुनीने प्रतिक्रिया दिली आहे. मात्र आता हा वाद वाढला असून गायिका सोना महापात्रा हिनेही त्यात उडी घेतली आहे. सोनाने संगीत लेबल आणि बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांच्या क्रिएटिव्ह टीमला यावर बोलण्याची विनंती केली आहे.

नुकतेच नेहा कक्करचे ‘ओ सजना’ हे गाणे प्रदर्शित झाले, जे फाल्गुनीच्या मैंने पायल है छनकाई’ या गाण्याचा रिमेक आहे. त्याला फाल्गुनी तसेच सोशल मीडियावर लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. यावर भाष्य करताना सोना मोहपात्राने ट्विटरवर लिहिले की, “मी फक्त अशी आशा करू शकते की संगीत लेबल आणि बॉलिवुड चित्रपट निर्माते आणि क्रिएटिव्ह टीम अशा शॉर्ट- कटवर बोलतील जे सर्जनशीलतेला मारत आहेत. त्यांच्यावर कारवाई करतील. फाल्गुनी पाठकच्या हिट गाण्याच्या रिमेककडे लक्ष द्या. तसेच, भारतीयांनो, अशा गोष्टींसाठी संघटीत व्हा.”

आणखी वाचा- “मला उलटी…” नेहा कक्करच्या ‘पायल है छनकाई’ रिमेकवर फाल्गुनी पाठकची पहिली प्रतिक्रिया

नेहा कक्करचं ‘ओ सजना’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर, फाल्गुनीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर नेहाच्या गाण्यावर मीम्स बनवलेले दाखवत अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. फाल्गुनीने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये एका चाहत्याने तिला नेहाविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. रिपोर्ट्सनुसार, फाल्गुनीने त्या स्टोरीवर प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली, ‘असं करण्याची माझी इच्छा आहे, पण माझ्याकडे अधिकार नाहीत.’

नुकत्याच एका मुलाखतीत फाल्गुनी पाठकने हे गाणे खराब केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. गाण्याच्या नवीन व्हर्जनमुळे त्याचा निरागसपणा संपून गेला आहे, असं तिने म्हटलं होतं. एवढेच नाही तर, जेव्हा या गाण्याचे नवीन व्हर्जन पहिल्यांदा ऐकले तेव्हा तिला जवळजवळ उलटी होणं बाकी राहिलं होतं असं तिने म्हटलं आहे. “हे ऐकल्यावर पहिली प्रतिक्रिया अजिबात चांगली नव्हती. मला उलट्या झाल्यासारखे वाटत होते.” असं फाल्गुनी पाठक म्हणाली होती.

आणखी वाचा- “इथे पीडिता हिंसेचा सामना करायला…” ट्रोलिंगबाबत स्वरा भास्करने मांडलं स्पष्ट मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फाल्गुनी पाठकच्या प्रतिक्रियेनंतर नेहाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “जर असं बोलून, माझ्याबद्दल अशा वाईट गोष्टी पसरवून, मला शिव्या देऊन… त्यांना चांगलं वाटत असेल आणि जर त्यांना वाटत असेल तर यामुळे माझा दिवस खराब होईल. तर मला माफ करा. देवाचे मूल नेहमी आनंदी असते कारण देव स्वतः मला आनंदी ठेवतो. मला आनंदी आणि यशस्वी पाहून दुःखी झालेल्यांबद्दल मला वाईट वाटते. कृपया कमेंट करत रहा मी त्या डिलीटही करणार नाही, कारण नेहा कक्कर काय आहे हे मला माहीत आहे आणि सगळ्यांना माहीत आहे.”