Rekha Net Worth : रेखा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. रेखा यांना आजही चाहत्यांची कमतरता नाही. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ हिंदी चित्रपटसृष्टीला दिला आहे. त्यांनी लहान वयातच चित्रपटात काम करायला सुरुवात केली. सुंदरतेने आणि सौंदर्याने त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत.

लोक अजूनही त्यांचा अभिनय आणि चित्रपट पाहण्याचा आनंद घेतात. रेखा खूप चांगलं आयुष्य जगतात. रेखा यांनी लोकप्रियतेबरोबरच प्रचंड पैसाही कमावला आहे. रेखा यांची संपत्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल. पण, त्यांनी कधी संपत्तीचा बडेजाव केला नाही. चला तर मग जाणून घेऊया रेखा यांची संपत्ती नेमकी किती आहे?

रेखा यांची एकूण संपत्ती किती?

रेखा यांनी त्यांच्या करिअरमध्ये चांगलीच कमाई केली आहे. त्या दीर्घकाळ सिनेमापासून दूर होत्या. रेखा यांचा मुंबईत बँड स्टँड येथे १०० कोटींचा बसेरा नावाचा बंगला आहे. त्यांची एकूण संपत्ती ३३२ कोटी आहे. रेखा यांच्याकडे अनेक लग्झरी कार आहेत. यात ६.१ कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट ही कार आहे. याशिवाय त्यांच्याकडे ऑडी ए8 (१.६३ कोटी), मर्सिडीज-बेंज एस-क्लास (२.१७ कोटी), २.०३ कोटीची बीएमडब्ल्यू आय ७ आणि इलेक्ट्रिक कारसुद्धा आहे. रेखा चित्रपटांमध्ये काम करत नसल्या तरी ब्रँड एंडोर्समेंट, शो प्रमोशन, उद्घाटन समारंभ इत्यादी गोष्टींमधून त्या दरवर्षी ६५ लाख रुपये कमावतात.

रेखा त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. अहवालांनुसार त्या एका चित्रपटासाठी १४ कोटी रुपये घेत असत. त्याव्यतिरिक्त त्या ब्रँड एंडोर्समेंटसाठी ६ कोटी रुपये घेत असत.

७० वर्षीय रेखा यांचा जन्म १० ऑक्टोबर १९९४ मध्ये चेन्नईत झाला होता. तेलुगू सिनेमातून त्यांनी बालकलाकार म्हणून सुरुवात केली, तर १९७० मध्ये आलेल्या ‘सावन भादो’ सिनेमातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पाय रोवले. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी असंख्य हिट सिनेमे दिले आहेत.

‘मुकद्दर का सिकंदर’, ‘खून भरी मांग’, ‘खूबसूरत’, ‘घर’, ‘नमक हराम’, ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’, ‘जीवन धारा’, ‘उमराव जान’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘लज्जा’, ‘जुदाई’, ‘प्यार की जीत’, ‘बहूरानी’, ‘दो अनजाने’, ‘बीवी हो तो ऐसी’ आणि ‘कोई मिल गया’ या त्यांच्या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती.