तरुणांच्या आयुष्यात प्रेमाची चाहुल लागली की सगळं वातावरणच रोमँटिक व्हायला लागतं. आपल्या प्रिय मुलीला कसं इम्प्रेस करता येईल याच्या विविध आयडिया सुचवल्या जातात. दुसऱ्यापेक्षा ती स्टाईल वेगळी असावी आणि प्रपोज करायचा क्षण कायम लक्षात राहावा यासाठी सगळा प्रयत्न सुरू असतो. पण काहीही न बोलता आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत प्रेमाच्या भावना पोहोचवता येतात, हेच दिग्दर्शक गोरख जोगदंडे यांनी त्यांच्या ‘रॉमकॉम’ या चित्रपटातून सांगितलं आहे.
दिग्दर्शकीय कौशल्यामुळेच ‘रॉमकॉम’ चित्रपटातली प्रेम व्यक्त करण्याची ही भन्नाट आयडिया तरुणाईच्या पसंतीला उतरली. आजच्या ऑनलाईन डेटिंगच्या जमान्यात असं शब्दांविना व्यक्त झालेलं प्रेम तरुणाईला भावलं आणि म्हणूनच त्यांच्या आग्रहाखातर ‘रॉमकॉम’ पुन्हा एकदा प्रदर्शित केला जाणार आहे. नात्याची हळुवार कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एक मुलगा आणि मुलगी यांच्यात फुलत जाणारं प्रेमाचं नातं अशी या चित्रपटाची हलकी फुलकी कथा आहे. ‘रॉमकॉम’ या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
दिग्दर्शक गोरख जोगदंडे यांचं नाव ‘दवबिंदू’, ‘जीवन एक संघर्ष’, ‘नजर, शूट आऊट अॅट भेंडी बजार’, ‘हक्क’ आणि त्यासोबतच हॉलिवूड चित्रपट ‘कूंग फू योगाच्या’ भारतीय भाषेतील व्हिडिओच्या प्रमोशनल साँगची धुरा सुध्दा सांभाळली अशा विविध चित्रपटांमुळे ते आधीच प्रसिद्ध झालं आहेत.
संदिप बाळकृष्ण बांगर आणि शिखा ग्लोबल एंटरटेनमेंट प्रस्तुत करत असून, ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म यांनी रॉमकॉम या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते, सुशील शर्मा सहनिर्माते आहेत. गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात विजय गिते आणि मधुरा वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, छाया कदम, अंतरा पाटील, श्वेता नाईक, स्वाती पानसरे, फकिरा वाघ,दिलीप वाघ,शोभा दांडगे, सिद्धेश्वरा आणि असित रेडीज अशी दमदार स्टारकास्ट आहे.