Latest OTT Release This Week : दिवाळीचा लाँग वीकेंड येत आहे. प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबीयांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणार आहे. जर तुम्हाला हा कौटुंबिक वेळ आणखी आनंददायी बनवायचा असेल, तर हे चित्रपट आणि सीरिज OTT प्लॅटफॉर्मवर नक्की पाहा.

या आठवड्यात नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, सोनीलिव्ह, झी५ व एमएक्स प्लेअरवर अनेक नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. तर, चला संपूर्ण यादीवर एक नजर टाकूया…

वॉर २

ओटीटी रिलीजबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांचा ‘वॉर २’ हा चित्रपट ९ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तुम्ही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

जमनापार

‘जमनापार २’ या ब्लॉकबस्टरचा दुसरा सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. दुसरा सीझन १० ऑक्टोबर रोजी अमेझॉन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीमिंगला सुरुवात झाली. नवीन सीझनमध्ये ऋत्विक साहोरे, वरुण बडोला, अंकिता सहगल, सृष्टी गांगुली रिंदानी, अनुभा फतेहपुरिया, ध्रुव सहगल व इंदर साहनी यांच्या भूमिका आहेत.

सर्च : द नैना मर्डर केस

अभिनेत्री कोंकणा सेन शर्माची बहुप्रतीक्षित सीरिज, ‘सर्च : द नैना मर्डर केस’ १० ऑक्टोबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. कोंकणा अभिनीत ही सीरिज रोहन सिप्पी यांनी दिग्दर्शित केली आहे.

कुरुक्षेत्र

‘कुरुक्षेत्र : महाभारत का महायुद्ध’ या अ‍ॅनिमेटेड सीरिजची सर्वांना आतुरतेने वाट पाहावी लागली आहे. ही सीरिज १० ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. जर तुम्ही अ‍ॅनिमेटेड चित्रपट आणि सीरिजचे चाहते असाल, तर तुमची प्रतीक्षा संपली आहे.

मिराई

कार्तिक गट्टमनेनी दिग्दर्शित ‘मिराई’मध्ये तेजा सज्जाने पुन्हा एकदा आपले दमदार अभिनय कौशल्य दाखवले आहे. ‘हनुमान’नंतर तेजानं या चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबरपासून जिओ हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

एव्हरीबडी लव्ह मी व्हेन आय अ‍ॅम डेड

जर तुम्ही इंग्रजी चित्रपट आणि सीरिजचे चाहते असाल, तर मग तुमच्यासाठी ‘एव्हरीबडी लव्ह मी व्हेन आय अ‍ॅम डेड’ हा एक चांगला पर्याय असू शकतो. ही सीरिज १४ ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.