‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात लाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री एवलिन शर्माने लग्नानंतर काही दिवसातच चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय. एवलिन लवकरच आई होणार आहे. एवलिनने बॉयफ्रेंड तुशान भिंडीशी लग्न केले आहे. तो ऑस्ट्रेलियात राहत असून एक डॉक्टर आहे. १५ मे रोजी त्यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे लग्न केले. २०१९मध्ये एवलिन आणि तुशानने साखरपुडा केला होता. एवलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर करत चाहत्यांनी ही बातमी दिली होती.
त्यानंतर नुकत्याच बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत एवलिनने ती आई होणार असल्याचा खुलासा केलाय. गरोदरपणाच्या या बातमीने एवलिन खूपच आनंदात आहे. १२ जुलैला एवलिनचा वाढदिवस असून ही बातमीच तिच्यासाठी मोठं गिफ्ट असल्याचं ती म्हणाली. तसचं एवलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केलाय.या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणालीय, “तुला माझ्या कुशीत घेण्यासाठी प्रतिक्षा करू शकत नाही.”
View this post on Instagram
पहा फोटो: गरोदर दिया मिर्झाने शेअर केले हनीमूनचे ‘ते’ जुने फोटो
तसंच मुलाखतीत एवलिन म्हणाली, “मला तर चंद्रावर असल्यासारखं वाटतंय. याहून सुंदर बर्थडे गिफ्ट माझ्यासाठी काय असणार. मी आशा करते की बाळाला घेऊन मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांना भेटू शकेन.” असं म्हणत एवलिनने ती ऑस्ट्रेलियामध्येच बाळाला जन्म देणार असल्याचं सांगितलं आहे.
१५ मेला एवलिनने गुपचुप लग्न उरकलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी तिने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची बातमी दिली होती. लग्नाविषयी बोलताना एवलिन म्हणाली, ‘तुमच्या सर्वात जवळच्या मित्राशी लग्न करणे या पेक्षा कोणतीही चांगली गोष्ट असू शकत नाही. संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
View this post on Instagram
तुशानने एवलिनला सिडनीमधील हार्बर ब्रीजवर प्रपोज केले होते. एवलिनला खूश करण्यासाठी एक खास नोट देखील लिहिली होती. एवलिनने स्वत: याबाबत खुलासा केला होता. तुशान हा ऑस्ट्रीलियामध्ये राहणारा आहे. तो एक डेंटल सर्जन आहे.