छोट्या पडद्यावरील बोल्ड अभिनेत्री म्हणून निया शर्मा ओळखली जाते. निया नेहमीच तिच्या लूक्समुळे चर्चेत असते. निया बऱ्याचवेळा तिच्या लूक्समुळे ट्रोल होताना दिसते. फक्त नेटकरी नाही तर तिच्या मैत्र-मैत्रिणींनी देखील तिला बऱ्याचवेळा ट्रोल केले आहे. त्यांनी अशी कमेंट केली होती की नियाला फार दुख: झालं होतं. याविषयी नियाने खुलासा केला होता.

निया बऱ्याचवेळा ट्रोलिंगवर चर्चा केली आहे. नेटकऱ्यांनी किती ट्रोल केलं तरी देखील तिला काही वाटतं नाही. पण जेव्हा आपल्या जवळचे लोक ट्रोल करतात तेव्हा वाईट वाटतं. नुकतीत नियाने ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली होती. यावेळी तिला तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिला कपड्यांवरून ट्रोल केले होते हे सांगितले. “मला म्हणाले की मी विचित्र लिपस्टिक का वापरते? ही चांगली वाटतं नाही. त्यानंतर मला बोलले की मी अवॉर्ड शोमध्ये नेकेड होऊन का फिरते? नेकेड तर मी इंग्रजीमध्ये बोलली, पण मला तर ते हिंदीमध्ये बोलले होते,” असे निया म्हणाली.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ सोनूच्या बॉयफ्रेंडला पाहिलत का?

निया पुढे म्हणाली, “सोशल मीडियावर इमेज शेअर करण्यावरून तिच्या रिलेशनशिपमध्ये अडचणी आल्या होत्या. सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यावरून पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडला त्रास होता. मला कळायचं नाही की याचा परिणाम आपल्या पर्सनल बॉन्डिंगवर कसा पडू शकतो. सोशल मीडिया तर सोशल मीडिया आहे त्याला आणि आपल्या खाजगी आयुष्याला लांब ठेवलं पाहिजे.”

आणखी वाचा : आराध्या बच्चनची ‘ती’ भविष्यवाणी ऐकून बच्चन कुटुंबियांना बसला होता धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या आधी निया ही ‘फियर फैक्टर खतरों के खिलाड़ी: मेड इन इंडिया’ मध्ये दिसली होती. त्यानंतर ती ‘जमाई राजा 2.0’ मध्ये दिसली होती. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. हा शो ‘जमाई राजा’ या शोचा दुसरा भाग होता.