बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पती निक जोनसमुळे नेहमीच चर्चेत असते. हे दोघे ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रियांका आणि निक चाहत्यांच्या संपर्कात राहतात. निकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्या शर्टची तुलना ही सोलापुरच्या चादरीशी केली आहे.
निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो निकने त्याचा पर्फॉर्मेंस झाल्यानंतर शेअर केला होता. या फोटोत निकने अप्रतिम असा ट्रेडिश्नल आणि लाल रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत ‘कालची रात्र सेंट लुईसमध्ये. खूप अप्रतिम अनुभव आणि शोसाठी सगळ्यांचे आभार,’ असे कॅप्शन निकने दिले.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘…चुपचाप खड़ा रह’, नीरज चोप्राचा डायलॉग ऐकून बिग बींची बोलती बंद
निकच्या या फोटोला ३ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. फोटोत नेटकऱ्यांचे लक्ष हे निकने परिधान केलेल्या शर्टने वेधले आहे. नेटकऱ्यांना निकने परिधान केलेल्या शर्टला पाहून सोलापुरच्या चादरीची आठवण आली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘हा शर्ट सोलापुरच्या चादरी पासून बनलेला आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सोलापुरची चादर.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अरे ही तर सोलापुरची चादर आहे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘या प्रकारच्या शर्टला भारतात चादर बोलतात’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी निकला ट्रोल केले आहे.
निकने गुरुवारी त्याचा २९ वा वाढदिवस साजरा केला आहे. प्रियांकाने निकला एका खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एवढंच नाही तर त्याच्यासाठी एक बर्थडे पार्टीचे देखील आयोजन केले होते. निकचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रियांका पेन्सिलवेनिया पोहोचली होती. त्यानंतर ती पुन्हा चित्रकरणासाठी लंडनला गेली. प्रियांका लवकरच ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसरणार आहे. या चित्रपटात प्रियांका कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.