रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (१८ ऑगस्ट) बिग बी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे काही फोटो नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. तसेच या फोटोंमध्ये नितीन गडकरी, अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चनही दिसत आहे. दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींच्या भेटीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. मात्र या फोटोंमधील एका गोष्टीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – “अजूनही फिल्टर पाड्यातील चाळीतच राहतो कारण…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं कसं आहे खरं आयुष्य?

रस्ता सुरक्षा अभियानामध्ये अमिताभ बच्चन यांनी सहभागी व्हावं हा या भेटीमागचा मुख्य उद्देश होता. नितीन गडकरी यांनी हे फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी या फोटोंवर विविध कमेंट केल्या आहेत. तसेच या फोटोंमध्ये एक फोटो फ्रेम दिसत आहे. ही फोटो फ्रेमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

नितीन गडकरी, अमिताभ बच्चन यांच्या भेटीदरम्यानचे फोटो तुम्ही बारकाईने पाहिले तर यामध्ये तुम्हाला एक फोटो फ्रेम दिसेल. या फोटो फ्रेममध्ये अमिताभ बच्चन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहेत. एकाच फोटोमध्ये किती अमिताभ बच्चन आहेत? असा प्रश्न ही फोटो फ्रेम पाहिल्यानंतर पडतो. नेटकऱ्यांनी ही फोटो फ्रेम पाहताच कमेंटच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – Dahi Handi 2022 : ठाण्यात एकनाथ शिंदे आणि श्रद्धा कपूर एकाच मंचावर, अभिनेत्री म्हणाली, “मुख्यमंत्री आपल्याबरोबर आहेत यापेक्षा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन गडकरी यांच्यामागे असणारी फोटोफ्रेम अगदी लक्षवेधी आहे, तुम्ही फक्त फोटोफ्रेमचे फोटो ट्विटरद्वारे शेअर करू शकता का?, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी ही फोटोफ्रेम बिग बींना एखाद्या चाहत्याने गिफ्ट म्हणून दिली असेल असं म्हटलं आहे.