गेल्या अनेक दिवसांपासून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटामुळे बराच वाद झाला आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. या चित्रपटावर आता केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच मत मांडलं आहे.

नितीय गडकरी यांनी नुकतीच इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्याता आलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे कौतुक करत ते म्हणाले, “द काश्मीर फाइल्स या चित्रपटाने काश्मीर खोऱ्यातील खरा इतिहास जगासमोर आणला आहे. त्यामुळेच हा चित्रपट लोक दीर्घकाळ लक्षात ठेवतील.”

आणखी वाचा : “माझ्या पतीने माझ्या ओळखीच्या सर्व महिलांसोबत…”, अभिनेत्री मंदाना करीमीने केला धक्कादायक खुलासा

आणखी वाचा : एप्रिल फूलचा विनोद पडला महागात, Video शेअर करत अंशुमन विचारेच्या पत्नीने केली ‘ही’ विनंती

या कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्यासोबत ग्लोबल कश्मीरी पंडित डायस्पोरा द्वारे द कश्मीर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अनुपम खेर आणि पल्लवी जोशी यांचा सन्मान करण्यात आला. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.