This South Star’s 7 Films Were India’s Official Oscar Entries : बॉलीवूडपेक्षाही सध्या साऊथच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. पण तुम्हाला माहितीये का, ही क्रेझ आजची नसून आधीपासूनच दाक्षिणात्य चित्रपट कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत आले आहेत. त्यांच्या चित्रपटांतील कथानक, मांडणी, संस्कृती या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांची मनं जिंकतात. एवढंच काय तर साऊथमधील एका सुपरस्टारच्या चित्रपटांची ऑस्करकडूनही दखल घेण्यात आली होती.

हे सुपरस्टार म्हणजे अभिनेते कमल हासन. कमल हासन दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासह ते लेखक व दिग्दर्शकही आहेत. कमल हासन यांच्या एक नाही, दोन नाही तर तब्बल ७ चित्रपटांना ऑस्करकडून नॉमिनेशन मिळालं होतं.

कमल हासन गेली सहा दशकं इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यांनी लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम केलं आहे आणि म्हणूनच आज ते साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांची दक्षिणेत खूप क्रेझ आहे. कमल हासन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५४ मध्ये तामिळनाडू येथे झाला होता. त्यांनी बालकलाकार म्हणून ‘कलाथूर कन्नम्मा’ या चित्रपटात काम केलं होतं. यासाठी त्यांना राष्ट्रपतींकडून सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचं गोल्ड मेडल मिळालं होतं.

कमल हासन यांनी अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यांनी एमजीआर, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन यांसाऱख्या नावाजलेल्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यांनी तेलुगू, मल्याळम, कानडी आणि हिंदी सिनेमांतही काम केलं आहे, त्यामुळे देशभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी ‘हय राम’, ‘विश्वरुप’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटांना जगभरातून चांगला प्रतिसाद मिळालेला.

कमल हासन यांच्या ‘या’ ७ चित्रपटांना मिळालं ऑस्करचं नॉमिनेशन

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार कमल हासन यांच्या ‘स्वाथी मुत्यम’, ‘सागर नायकान’, ‘थेवार मगन’, ‘कुरुथीपुनाल’, ‘इंडियन’ आणि ‘हय राम’ या चित्रपटांना ऑस्करचं नॉमिनेश मिळालं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्करकडून त्यांना वोटिंग कमिटीचा सदस्य होण्यासाठी आमंत्रण मिळालं होतं. याव्यतिरिक्त त्यांना १९ फिल्मफेअरचे पुरस्कार मिळाले असून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.