बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर व आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत असलेली ‘द नाइट मॅनेजर’ ही वेब सीरिज १७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाली. ॲक्शन थ्रिलर असलेली ही सीरिज ‘द नाइट मॅनेजर’ या इंग्लिश वेब सीरिजचा रिमेक आहे. रंजक व उत्कंठावर्धक कथानकामुळे ही सीरिज खूप चर्चेत आली. तर त्यानंतर आता या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

पहिल्या भागाची कथा अत्यंत रंजक होती. या सीरिजच्या पहिल्या सीझनचा शेवट असा केला गेला की प्रेक्षकांना या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रचंड उत्सुकता लागली होती. तर आता अखेर या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. त्या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या कथेने आणि याचबरोबर यातील दृश्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा : नव्या वस्तूंना प्राचीन टच, ‘असं’ आहे अनिल कपूर यांचं घर, पाहा फोटो

‘द नाइट मॅनेजर २’ च्या १ मिनिट ५९ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये, आदित्य रॉय कपूर सिक्रेट एजंट बनून अनिल कपूरची कशी फसवणूक करीत आहे हे दिसत आहे आणि या नवीन सीझनमध्ये आदित्य रॉय कपूरला अभिनेत्री शोभिता धूलिपाला मदत करताना दिसणार आहे. शोभिताने या सीरिजमध्ये अनिल कपूरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर शोभिता आणि आदित्य या नव्या सीझनमध्ये अनिल कपूरचे गैरव्यवहार उघड करण्यासाठी खेळी खेळणार आहेत. पण अशातच अनिल कपूरला आदित्य आणि शोभिताचा संशय आल्याचेही या ट्रेलरमध्ये दिसत आहे.

हेही वाचा : Video: उणे ११०° तापमान, अंगावर शर्टही नाही…; अनिल कपूर यांचा वर्कआउट व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर या ट्रेलरमध्ये ॲक्शन सीन्स आहेत आणि आदित्य रॉय कपूर आणि शोभिताचा इंटिमेट सीनदेखील आहे. त्या दोघांचा हा सीन सध्या खूप चर्चेत आला आहे. गेल्या सीझनमध्ये त्या दोघांचं अफेअर असल्याची हिंट देण्यात आली होती. तर दुसऱ्या सीजनमध्ये आता थेट त्यांच्या इंटिमेट सीनने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे या नव्या सीझनमध्ये काय काय होतंय हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘द नाइट मॅनेजर’चा दुसरा सीजन ३० जून रोजी प्रदर्शित होईल.