Filmfare OTT Awards 2023: सध्या चित्रपटांच्या बरोबरीनेच ओटीटी प्लॅटफॉर्मनासुद्धा चांगलंच महत्त्व मिळायला लागलं आहे. बरेच चित्रपट, सीरिज या थेट ओटीटीवर प्रदर्शित होतात अन् प्रचंड लोकप्रिय होतात. या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट तसेच सीरिजमधून नवीन चेहेरेदेखील समोर येतात. कित्येक बॉलिवूड कलाकारांनी तर ओटीटीमध्येही नशीब आजमावलं आहे. सैफ अली खान, मनोज बाजपेयी ते शाहिद कपूरपर्यंत कित्येक स्टार्स आता ओटीटीकडे वळू लागले आहेत.

आणखी वाचा : “चित्रपटसृष्टीत नेपोटीजम असूच शकत नाही कारण…” जावेद अख्तर यांचं विधान चर्चेत

दरवर्षीप्रमाणे नुकताच फिल्मफेअरचा यंदाचा ओटीटी पुरस्कार सोहळा पार पडला. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या आलिया भट्टने यंदाच्या ओटीटी पुरस्कारातही बाजी मारलेली आहे, तर मनोज बाजपेयी यांच्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटालाही चांगलेच पुरस्कार मिळाले आहेत. फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार २०२३ मध्ये नेमके कोणाकोणाला पुरस्कार मिळाले ते आपण जाणून घेऊयात.

फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार २०२३ :

उत्कृष्ट अभिनेता : मनोज बाजपेयी (चित्रपट : सिर्फ एक बंदा काफी है)
उत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (चित्रपट : डार्लिंग्स)
उत्कृष्ट पदार्पण : राजश्री देशपांडे (सीरिज : ट्रायल बाय फायर)
उत्कृष्ट दिग्दर्शक : अपूर्व सिंह कारकी (चित्रपट : सिर्फ एक बंदा काफी है)
उत्कृष्ट चित्रपट : सिर्फ एक बंदा काफी है
उत्कृष्ट दिग्दर्शन : विक्रमादित्य मोटवाने (सीरिज : जुबिली)
उत्कृष्ट सीरिज : स्कूप
उत्कृष्ट अभिनेता क्रिटीक्स : विजय वर्मा (दहाड)
उत्कृष्ट अभिनेत्री क्रिटीक्स : करिश्मा तन्ना (स्कूप) व सोनाक्षी सिन्हा (दहाड)
उत्कृष्ट दिग्दर्शक क्रिटीक्स : रणदीप झा (सीरिज : कोहरा)

याबरोबरच उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून शेफाली शाह यांना ‘डार्लिंग्स’ या चित्रपटासाठी व अमृता सुभाष हिला ‘द मिरर’ आणि ‘लस्ट स्टोरीज २’साठी पुरस्कार मिळाला.