अभिषेक बच्चन आणि त्याचे वडील अमिताभ बच्चन यांच्यात नेहमीच तुलना केली जाते. अभिषेकला त्याच्या कामावरून अनेकजण ट्रोल करताना दिसतात. पण अभिषेक मात्र कोणावरही चिडचिड न करता त्या ट्रॉलर्सना अगदी नीट हाताळतो. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या मुलाचा फार अभिमान आहे. आता नुकताच एक त्यांनी अभिषेकसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. अभिषेक बच्चन यांच्या उत्कृष्ट कामगिरीचं त्यांनी या पोस्टमधून कौतुक केलं आहे.

नुकतीच ओटीटी फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कार सोहळ्यात अभिषेक बच्चन यांच्या दसवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर अभिषेक बच्चनच्या खात्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आला. अभिषेकच्या या कामगिरीने अमिताभ अत्यंत खूष झाले आहेत.

आणखी वाचा : कोणी बंगले तर काहींनी ड्युप्लेक्स…’या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी २०२२मध्ये घेतली नवीन घरं, किमती ऐकून व्हाल थक्क

अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं, “मोस्ट डिझर्विंग अवॉर्ड… शाब्बास भय्यू. तू सर्वोत्कृष्ट होतास आणि यापुढेही राहशील. तू तुझ्या प्रामाणिकपणाने स्वतःला सिद्ध केलं आहेस. असंच काम यापुढेही करत रहा. लोक कदाचित तुझी थट्टा करू शकतील पण ते तुला दुर्लक्षित करू शकणार नाहीत.”

हेही वाचा : “तेव्हा शाहरुखने मला…”; अभिषेक बच्चनने जागवल्या स्ट्रगलच्या काळातल्या आठवणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यापाठोपाठ त्यांनी आणखीन एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी लिहिलं, “माझा अभिमान…माझा आनंद… तू स्वतःला सिद्ध केलं आहेस. लोकांनी तुझी खिल्ली उडवली पण तू तुझ्या धैर्याने सर्वांना जिंकलंस. तू बेस्ट आहेस आणि यापुढेही राहशील.” अमिताभ यांच्या ट्वीटने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.