गेल्या काही महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्षित झालेला चित्रपट काही दिवसातच ओटीटीवर दाखल होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गुडबाय’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘गुडबाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अमिताभ बच्चन वडिलाच्या भूमिकेत आहेत, तर रश्मिका मंदानाने त्यांच्या मुलीची भूमिका साकारतेय. चित्रपटगृहानंतर आता लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : ‘गुडबाय’ चित्रपटासाठी विकास बहल यांनी मानले क्रिती सेनॉनचे विशेष आभार, जाणून घ्या काय आहे कनेक्शन

या चित्रपटातून रश्मिकाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्याने सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले होते. अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुडबाय’ या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचे हक्क ‘नेटफ्लिक्स’ने विकत घेतल्याचे बोलले जात आहे. अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलेली नाही. परंतु नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट ओटीटीवर दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘गुडबाय’ या चित्रपटाला प्रदर्शनाच्या आधी प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चित्रपटगृहात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी या चित्रपटाच्या टीमला अपेक्षा होती. पण प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यात फारसा रस दाखवला नाही. गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने फारशी चांगली कमाई केलेली नाही. त्यामुळेच हा चित्रपट लगेचच ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्माते घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा : शेफ होत प्रियांका चोप्राने पहिल्यांदाच घडवली तिच्या ‘सोना’ रेस्टॉरंटच्या किचनची सफर, व्हिडिओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांच्यासह नीना गुप्ता आणि पवैल गुलाटी असे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. तसेच या चित्रपटामध्ये सुनील ग्रोव्हर, एली अवराम, साहिल मेहता, अभिषेक खान यांनी सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. विकास बहल यांनी ‘गुडबाय’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.