Who is Winner of Rise and Fall: मालिकांप्रमाणेच अनेक रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येतात. बिग बॉस, मास्टर शेफ, डान्स रिअॅलिटी शो, इंडियाज गॉट टॅलेंट, खतरों के खिलाडी असे अनेक शो प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसतात. या सर्व शोबरोबरच राईजअँड फॉल हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
राईज अँड फॉल या शोचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये सोशल मिडिया एन्फ्लुएन्सर, काही लोकप्रिय कलाकार सहभागी झाले होते.
युवराज चहलची एक्स पत्नी धनश्री वर्मा, अभिनेता आणि लोकप्रिय सूत्रसंचालक अर्जुन बिजलानी, निक्की तांबोळीचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल, जो बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्येदेखील दिसला होता. याबरोबरच, लोकप्रिय कॉमेडियन किकू शारदा, आदित्य नारायण, अकृती, आरुष भोला हे स्पर्धक दिसले होते.
अरबाज पटेल नव्हे तर ‘हा’ स्पर्धक ठरला ‘राईज अँड फॉल’चा विजेता
रूलर अँड वर्कर्स या संकल्पनेवर आधारित हा शो पाहायला मिळाला. जे रुलर या भागात असायचे, त्यांना उत्तम सोयी सुविधा मिळत, तर जे स्पर्धक वर्कर्स या भागात असतील त्यांना कमी सोयी सुविधा मिळत असल्याचे दिसत होते. तसेच, महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार जे रुलर होते,त्यांना मिळत होता. आता यादरम्यान, स्पर्धकांमध्ये भांडण, वाददेखील झाले. काही स्पर्धकांमध्ये मैत्रीदेखील पाहायला मिळाली. आता या शोचा विजेता कोण ठरला आहे, हे जाणून घेऊ…
अर्जुन बिजलानी हा राईज अँड फॉलचा विजेता ठरला आहे. त्याला २८ लाखांचे बक्षीस मिळाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर आरुष भोला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अरबाज पटेल आहे.राईज अँड फॉलचे विजेतेपद पटकवल्यानंतर अर्जुन व त्याची पत्नी नेहा दोघेही भावुक होताना दिसले. तसेच, फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत आरुष हा माझ्यासाठी विजेता आहे, असे अर्जुनने वक्तव्य केले.
अशनीर ग्रोवरने राईज अँड फॉल या शोचे सूत्रसंचालन केले. बिग बॉसप्रमाणेच या शोलादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.दरम्यान, अर्जुन आता या आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.