Horror Comedy Movies on OTT: आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांचा ‘थामा’ हा चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. २१ ऑक्टोबरला ‘थामा’ चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला हर्षवर्धन राणेचा ‘एक दीवाने की दीवानियत’ चित्रपट चांगलीच टक्कर देतोय. पण कमाईच्या बाबतीत आयुष्मानच्या ‘थामा’ने हर्षवर्धनच्या चित्रपटाला मागे टाकलं आहे.
तुम्हालाही अरे हॉरर कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असतील, तर ओटीटीवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही घरबसल्या हे चित्रपट पाहून वीकेंड मजेशीर बनवू शकता. कोणते आहेत हे पाच चित्रपट? जाणून घ्या.
स्त्री (Stree)
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘स्त्री’ हा परफेक्ट हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. याचे दोन्ही भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. जर तुम्ही अजून ‘स्त्री’ पाहिला नसेल, तर तो अमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. यामध्ये पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटाने हॉरर-कॉमेडी जॉनरमध्ये सर्वाधिक कमाई केली होती.
भूल भुलैया (Bhool Bhulaiyaa)
हॉरर-कॉमेडी म्हटली की या यादीत भूल भुलैयाचं नाव असणारच. भूल भुलैयाचे आतापर्यंत तीन भाग आले असून पहिल्या भागात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या चित्रपटाचे तिन्ही भाग पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
रूही (Roohi)
राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा ‘रूही’ हा आणखी एक मनोरंजक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. चित्रपटातील डायलॉग्स चांगलेच गाजले होते.
भूतनाथ (Bhoothnath)
जर तुम्हाला कुटुंबाबरोबर बसून हॉरर-कॉमेडी सिनेमा पाहायचा असेल, तर भूतनाथ नक्की पाहा. भूतनाथ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. यात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती.
भेडिया (Bhediya)
वरुण धवन आणि कृति सेनन यांचा भेडिया हा आणखी एक हिट हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. मॅडोक फिल्मची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट तुम्ही जिओहॉटस्टारवर पाहू शकता.
