‘द कपिल शर्मा शो’ या विनोदी कार्यक्रमाने आजपर्यंत प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि मग ‘द कपिल शर्मा शो’ने मागे वळून पाहिलंच नाही. २०१६ रोजी सुरू झालेल्या या कोमॅडी शोने अनेक चित्रपटांचं प्रमोशन करत आपलं विनोदी कौशल सादर केलं. या शोमध्ये कपिल शर्मा, सुनिल ग्रोवर, अली असगर, किकू शारदा अशा अनेक विनोदी कलाकारांचा सहभाग होता.

पण काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाला जाताना कपिल व सुनीलचं विमानात भांडण झालं, नंतर ‘डॉ. गुलाटी’ हे पात्र साकारणाऱ्या सुनीलने हा शो सोडला. त्यानंतर बऱ्याचदा तो परतेल अशी चर्चा झाली मात्र सुनील परतला नाही. परंतु आता सहा वर्षांनी कपिल व सुनील यांच्यातील सर्व मतभेद संपले असून ते नव्या शोमध्ये म्हणजेच ‘द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये’ प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतायत. अशातचं आता पुन्हा एकदा कपिल आणि सुनील एकत्र विमानाने प्रवास करतायत आता या प्रवासात तरी दोघं भांडण करणार नाहीत ना? अशा चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा… “४ महिन्यांची लेक एकटी…”, २६/११ ला पतीसह ताजमहाल हॉटेलमध्ये अडकलेली सोनाली खरे

कपिलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात कपिल सुनिल ग्रोवरसह फ्लाईटने प्रवास करताना दिसतोय. सहा वर्षांपूर्वी विमानात झालेल्या भांडणाचा हास्यास्पद उल्लेख करत “काळजी करू नका मित्रांनो, ही एक छोटी फ्लाइट आहे.” असं मजेशीर कॅप्शन कपिलने या पोस्टला दिलं आहे. कपिलच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी आणि क्रिकेटर्सनी कमेंट्स केल्या आहेत. “सोनू, ड्रिंक में दो बूंद सोडियम थायोसल्फेट डाल ही दो. टेस्ट के लिए” अशा डायलॉगची कमेंट अभिनेत्री अदा शर्माने केली आहे. तर क्रिकेटपटू युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनी हसण्याचे इमोजी वापरून कमेंट केली आहे.

“कॅप्शन असं असलं पाहिजे की- काळजी करू नका मित्रांनो, ही एक छोटीशी फाईट आहे.. अरेरे फाईट नाही फ्लाइट आहे.”, “ऑस्ट्रेलियाला नाही जात आहात ना”, “कृपया आता तरी भांडू नका” अशा अनेक मजेशीर कमेंट्स नेटकर्यांनी या फोटोवर केल्या आहेत. कपिल आणि सुनीलचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

हेही वाचा… ‘प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी’ ऐतिहासिक निर्णयानंतर अभिनेत्रीने लावलं आईचं नाव, पोस्ट शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘द कपिल शर्मा शो’च्या यशानंतर आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर सुरू करण्यात आला आहे. ज्यामुळे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षक घेऊ शकतात. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पहिल्या भागात रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूरने हजेरी लावली होती.