scorecardresearch

“मी आज अरबाजमुळेच…” पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल मलायका अरोराने केलेलं वक्तव्य चर्चेत

मलाका अरोराने ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ शोमध्ये केले अनेक खुलासे

“मी आज अरबाजमुळेच…” पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल मलायका अरोराने केलेलं वक्तव्य चर्चेत
मलायकाने अरबाज खानबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोचा पहिला भाग प्रदर्शित झाला. या शोमध्ये मलायकाने तिचं पहिलं लग्न व पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानबाबत अनेक खुलासे केले आहेत.

‘मुव्हिंग इन विथ मलायका’ शोच्या पहिल्या भागात फराह खान पाहुणी कलाकार म्हणून सहभागी झाली होती. मलायकाने फराहशी तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांबद्दल चर्चा केली. याबरोबरच तिने अरबाजच्या स्वभावाबाबतही या शोमध्ये उघडपणे वक्तव्य केलं. मलायका म्हणाली, “अरबाज खान एक उत्तम व्यक्ती आहेत. त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे. मला आयुष्यात जे काही करायचं होतं, ते त्यांनी मला करू दिलं. माझ्या यशस्वी आयुष्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे”.

हेही वाचा>> राणादा-पाठकबाईंच्या रिसेप्शन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला अन्…; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

मलायकाने या शोमध्ये तिच्या अपघाताबद्दलही भाष्य केलं. त्या कठीण काळातही अरबाजने साथ सोडली नसल्याचं मलायकाने सांगितलं. “अपघात झाल्यानंतर मी ऑपरेशन थिएटरमधून व्हिलचेअरवर बाहेर आले. मी डोळे उघडल्यानंतर माझ्यासमोर अरबाज खान उभे होते. अरबाज एक अशी व्यक्ती आहेत, जी कठीण प्रसंगात परिस्थितीची पर्वा न करता कायम तुमच्याबरोबर उभी राहते”, असंही मलायका पुढे म्हणाली.

हेही वाचा>> महापरिनिर्वाण दिनी गौरव मोरेची खास पोस्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शेअर करत म्हणाला…

मलायका व अरबाजने १९९८ साली लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. परंतु, १८ वर्षांनंतर २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. सध्या मलायका बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 11:44 IST

संबंधित बातम्या