Mirage on Sony Liv : सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट म्हटलं की सर्वाधिक चर्चा होते ती मल्याळम व तमिळ चित्रपटांची. जर तुम्हालाही दाक्षिणात्य चित्रपट आणि वेब सीरीज पाहायला आवडत असतील, तर लवकरच तुमच्यासाठी ओटीटीवर एक दमदार सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आला आहे. दृश्यमला टक्कर देणारा सस्पेन्स या सिनेमात आहे. या चित्रपटाचे नाव आहे मिराज.

दाक्षिणात्य चित्रपट ‘मिराज’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आसिफ अली अभिनीत या चित्रपटाची निर्मिती जीतू जोसेफ यांनी केली आहे. जीतू यांनी दृश्यमची निर्मिती देखील केली होती. दृश्यम तुम्ही मल्याळम तसेच हिंदी भाषेत पाहिला असेल.

मिराज चित्रपट सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २० ऑक्टोबर रोजी रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, तसेच मराठी आणि बंगाली भाषेत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

Mirage चित्रपटाची कथा

या चित्रपटात, अभिरामी (अपर्णा बालमुरली) शांततेत आयुष्य जगत असते. पण अचानक तिचा होणारा पती किरण (हकीम शाहजहान) गायब झाल्यावर तिचं आयुष्य बदलतं. अभिरामी त्याला शोधण्यासाठी निघते आणि डिजिटल इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट अश्विनबरोबर (आसिफ अली) एक टीम बनवते. कथा पुढे सरकते आणि किरणचा शोध सुरूच राहतो, यादरम्यान अनेक ट्विस्ट येतात. कधीकधी, कथा खूपच तणावपूर्ण वाटते, तर कधीकधी वाटतं की सगळा गुंता सुटलाय. हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या चित्रपटाच्या कथेत सस्पेन्स उत्तम विणला आहे, त्यामुळे तुमची शेवटपर्यंत स्क्रीनवरून नजर हटत नाही.

Mirage चित्रपटातील कलाकार

मिराजमध्ये आसिफ अली, अपर्णा बालामुरली, हॅना रेजी कोशी, अर्जुन श्याम गोपन, हकीम शाहजहान, संपत हे कलाकार आहेत.

मिराज बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन

मिराज बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मिराज चित्रपटाचे बजेट १४ कोटी रुपये आहे. मिराजने एकूण ६.२७ कोटी रुपयांची कमाई केली. मिराज थिएटरमध्ये फ्लॉप ठरलाय, पण त्याला ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला जर ओटीटीवर एखादा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही मिराज सोनी लिव्हवर पाहू शकता.