आजकाल नेटफ्लिक्स जवळजवळ प्रत्येकजण वापरतो जिथे तुम्हाला नवीन चित्रपट आणि वेबसीरिज पाहायला मिळतात. Netflix हे मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे. शिवाय कोविड काळापासून अशा वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची चांगलीच चलती आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि त्यात स्वस्तातील इंटरनेटची सुविधा असल्याने ओटीटीचा वापर भारतात चांगलाच वाढला आहे. आता याबद्दलच एक नवी माहिती समोर आली आहे.

जर तुम्ही तुमचा नेटफ्लिक्सचा पासवर्ड तुमच्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना दिला असेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.सध्या सर्रास प्रत्येक जण ओटीटीचा पासवर्ड एकमेकांबरोबर शेअर करत आहेत, त्यामुळे एकाच लॉग इन आयडीवर ४ ते ५ लोक त्या प्लॅटफॉर्मवरील कंटेंटचा आस्वाद घेत आहेत. आता हे लवकरच बंद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा : “जर त्यांना चूक सापडली असती..” लेखक मनोज मुंतशीर यांची ‘बेशरम रंग’ गाण्याच्या वादावर टिप्पणी

लवकरच आता या पासवर्ड शेअरिंगवर बंधन येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. एकाच अकाऊंटवर बरीच लोक कंटेंट बघत असल्याने ओटीटी कंपन्यांना प्रचंड नुकसान होत आहे. यामुळेच आता पासवर्ड शेअर करणं हा आता कायदेशीररित्या गुन्हा मानला जाऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलीकडेच, सरकारच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कार्यालयाने पायरसी संदर्भात एक नवीन नियमावली तयार केली आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मचा पासवर्ड कोणत्याही व्यक्तिबरोबर शेअर केल्यास तुमच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. ही गोष्ट केवळ नेटफ्लिक्सच्या बाबतीतच नव्हे तर बाजारातील सर्व OTT प्लॅटफॉर्मसाठी लागू होईल. हा नियम भारतात अजूनतरी लागू झाला नसला तरी तो यूकेमध्ये लागू करण्यात आला आहे, त्यामुळेच याची चर्चा सध्या भारतातही होत आहे.