गेल्या काही वर्षात सस्पेन्स थ्रिलर आणि गुन्हेगारीवर आधारित अनेक वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्या सिरीजना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर ‘दिल्ली क्राईम २’ ही सिरीज दाखल झाली. या सिरीजच्या पहिल्या भागाप्रमाणेच याचा दुसरा सिझनही गाजला. या सिरीजच्या यशानंतर नेटफ्लिक्सने गुन्हेगारीवर आधारित एका नव्या सिरीजची घोषणा केली आहे.

आणखी वाचा : Video : “आता खूप झालं…” अयान मुखर्जीवर वैतागला रणबीर कपूर, व्हिडीओ व्हायरल

‘स्पेशल ऑप्स’, ‘अय्यारी’, ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ यासारख्या उत्तमोत्तम कलाकृती बनवणारा दिग्दर्शक नीरज पांडे आता एक सस्पेन्स आणि गुन्हेगारीने भरलेली सिरीज नेटफ्लिक्सवर घेऊन येत आहे. या सिरीजचं नाव आहे ‘खाकी: द बिहार चॅप्टर.’ भाऊबीजेच्या मुहूर्तावर या सिरीजचा एक टीझर व्हिडीओ नेटफ्लिक्सने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटबरून शेअर केला आहे. या सिरीजची कथा बिहारची असून एक जमीनदार आणि एक पोलिस अधिकारी यांच्यातील संघर्षावर आधारीत आहे. आधारित आहे. ही सिरीज ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या आधारे बनवली जाणार असल्याचेही बोलले जाते.

हेही वाचा : आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ थिएटरनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर नशीब आजमावण्यासाठी सज्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ही सिरीज शूट करतानाचे बिहाईंड द सीन्स दिसत आहेत. या सिरीजमध्ये करण टैकर, अविनाश तिवारी, आशुतोष राणा, रवि किशन, अनूप सोनी, जतिन सरना, निकिता दत्ता, अभिमन्यु सिंह, ऐश्वर्य सुष्मिता, विनय पाठक या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या सिरीजचे काम सध्या सुरु असून लवकरच ही वेब सिरीज नेटफ्लक्सवरून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.