Panchayat 4 Public Review : ‘फुलेरा’ नावाचं गाव, तिथले गावकरी, सचिव, प्रधान यांच्याभोवती फिरणारी ‘पंचायत’ ही भारतातील सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. प्राइम व्हिडीओची ओरिजनल सीरिज ‘पंचायत’चा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आधीचे तीन सीझन यशस्वी झाल्यानंतर निर्मात्यांनी चौथ्या सीझनची घोषणा केली होती. अखेर ‘पंचायत 4’ प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली आहे.
‘पंचायत’च्या चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता सीरिज प्रदर्शित होताच चाहते ती पाहण्यात व्यग्र आहेत. काहींनी तर ही सीरिज पाहून सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. या सीरिजला संमिश्र रिव्ह्यू मिळाले आहेत. ज्या प्रेक्षकांनी ‘पंचायत 4’ ही सीरिज पाहिली, त्यांना कशी वाटली? ते जाणून घेऊयात.
काही प्रेक्षकांना ‘पंचायत 4’ आवडली आहे, तर काहींनी मात्र या सीरिजला रटाळ म्हटलं आहे. या सीरिजचे प्रेक्षकांनी रिव्ह्यू केले आहेत. त्यांच्या पोस्टवर एक नजर टाकुयात.
प्रेक्षकांच्या पोस्ट
पंचायत 4 ची सुरुवात खूप चांगली झाली, पण नंतर ती राजकारणात अडकली. पंचायत आधीसारखी राहिली नाही. काही क्षण जुने होते, पण एकंदरीत या पर्वाची वाट पाहावी इतकं खास काही नव्हतं. मात्र, तरीही बऱ्याच ओटीटी शोपेक्षा चांगली आहे, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
पंचायत सीझन ४ ने त्याचा कॉमिक चार्म गमावला आणि राजकारणाकडे जास्तच झुकली. यातील भावनिक क्षण चांगले आहे, पण विनोदाची कमतरता होती. काही उत्तम दृश्ये, पण त्यात तो स्पार्क नव्हता, सीझन आणखी चांगला असू शकला असता, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
Panchayat 4 जुन्या सीझनप्रमाणेच छान आहे. हा सीझन प्रामुख्याने निवडणुका आणि राजकारणाभोवती फिरतो. सर्वांचे परफॉर्मन्स उत्तम होते, काही भावनिक क्षणही खूप चांगले होते. विनोद कमी होता, पण एकूणच ही सीरिज नक्कीच पाहण्यासारखी आहे, असं एका युजरने पोस्टमध्ये लिहिलं.
Panchayat Season 4 पूर्ण पाहिली. सगळा सीझन फुलेराच्या राजकारणावर आधारित आहे. लौकी vs प्रेशर कुकर, सामोसा डिप्लोमसी आणि एकदम गावातला निवडमूक तमाशा. जुना चार्म अजूनही आहे, पण फार नाही. कधी कधी हसायला आलं, तर काही वेळा वाटलं की उगाच ताणलंय. पण तरीही ही कलाकारांनी हे सगळं उत्तम सांभाळून घेतलं, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.