पाच राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित साऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मोहनलाल फक्त अभियनच करत नाहीत, तर ते चित्रपट निर्माते, पार्श्वगायक, वितरक, दिग्दर्शक आणि बिझनेसमॅन देखील आहेत. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. लष्कराकडून मानद लेफ्टनंट कर्नल पद दिले जाणारे ते पहिले अभिनेते आहेत. एका वर्षात ३४ चित्रपट करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे, त्यापैकी २५ चित्रपट सुपरहिट ठरले. मोहनलाल ६४ वर्षांचे आहेत. आज त्यांच्या काही ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात, जे ओटीटीवर उपलब्ध आहेत.

ब्रो डॅडी

हा कॉमेडी ड्रामा चित्रपट २०२२ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘ब्रो डॅडी’ मध्ये मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासह कल्याणी प्रियदर्शन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पृथ्वीराज सुकुमारनने केले आहे. हा चित्रपट तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

Video: पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलं लग्न, दुसऱ्यांदा आई झाली अभिनेत्री; बाळाचं नाव केलं जाहीर

जेलर

हा रजनीकांतचा चित्रपट आहे. पण मोहनलाल यांनी त्यांच्या छोट्याशा भूमिकेतही उत्तम अभिनय केला आहे. तुम्ही हा प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. या चित्रपटाने भारतात ३२८ कोटींहून जास्त कमाई केली. दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्या या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त ॲक्शन सिक्वेन्स पाहायला मिळाले होते.

मलायकोट्टाई वालिबन

हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. तुम्ही हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं

12th मॅन

हा एक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा एका खून आणि फोन कॉलवर बेतलेली आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

लुसिफर

हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले होते. हा पॉलिटिकल ड्रामा तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

पती फोटोग्राफर तर सासरे मंत्री, स्वत: राजकुमारी असलेली अभिनेत्री अभिनय सोडून रमली संसारात, पाहा Photos

नेरू

हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा एका अंध महिलेची आहे, जिला न्याय मिळवून देण्यासाठी एक माजी वकील खटला लढतो. तुम्ही हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

दृश्यम

हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या मल्याळम चित्रपटांपैकी एक होता. त्याचा दुसरा भागही खूप गाजला होता. तुम्ही प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट पाहू शकता.

तमन्ना भाटियाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, १७ दिवसांपासून करतोय तुफान कमाई; तुम्ही पाहिला का?

मोहनलाल यांच्या अनेक चित्रपटांचे हिंदी रिमेक बनले आहेत. ‘भूल भुलैया’, ‘दृश्यम’, ‘गरम मसाला’, ‘हंगामा’ आणि ‘खट्टा मीठा’ हे चित्रपट त्यांच्या दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक आहेत.