चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट ‘बिंबिसार’ हा झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. तेलगू भाषेतील हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही पाहता येणार आहे. दिवाळीला प्रदर्शित झालेल्या ‘बिंबिसार’ या चित्रपटाने अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर कमाई करायला सुरुवात केली होती.

या  चित्रपटाला झी५ वर ४८ तासांत तब्बल १०० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच नाही तर हैदराबादच्या विजयवाडामध्ये चित्रपटाच्या चाहत्यांनी ही गोष्ट अत्यंत जल्लोषात साजरी केली आहे. एनटीआर आर्ट्सची निर्मित असलेला ‘बिंबीसार’ २१ ऑक्टोबर २०२२ रोजी झी५ वर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलं आहे.

आणखी वाचा : ‘लायगर’ फ्लॉप झाल्याने दिग्दर्शकाला येत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या; पोलिसांत दाखल केली तक्रार

प्रेक्षकांच्या प्रतिसाद पाहून नंदामुरी कल्याण राम या अभिनेत्याने त्याचं मनोगतही व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, “बिंबिसारच्या जागतिक डिजिटल प्रीमियरला प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून मला खूप आनंद झाला आहे. या चित्रपटाने दिवाळीच्या आठवड्यात १०० दशलक्ष स्ट्रीमिंग मिनिटांचा टप्पा पार केला ही गोष्ट एक भारतीय म्हणून सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी मी कायम ऋणी राहीन.”

View this post on Instagram

A post shared by ZEE5 Tamil (@zee5tamil)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक मल्लीदी वशिष्ठ यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, “हा चित्रपट माझ्या अत्यंत जवळचा आहे आणि सदैव राहिल. प्रेक्षकांनी आमच्या चित्रपटातील कंटेंटची प्रशंसा करून ती स्वीकारला आहे यासाठी मी त्यांचा आभारी आहे.”