scorecardresearch

वरुण धवनने केलं ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल वक्तव्यं; म्हणाला “यामुळे भारतीय चित्रपटांना…”

हॉलिवूडच्या ‘सीटाडेल’ या प्रोजेक्टच्या भारतीय रिमेकवरही वरुण काम करत आहे.

वरुण धवनने केलं ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल वक्तव्यं; म्हणाला “यामुळे भारतीय चित्रपटांना…”
वरुण धवन | Varun-Dhawan

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा आगामी ‘भेडिया’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला अजून वरुण एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणर आहे, नुकताच प्राइम व्हिडिओच्या नव्या ‘प्राइमबे’ या नव्या उपक्रमानिमित्त वरुण धवनने बॉलिवूड हंगामाशी संवाद साधला. यामध्ये त्याने चित्रपटसृष्टि आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल मत व्यक्त केलं आहे.

वरुण म्हणाला, “पहिली काही वर्षं ओटीटीवर येणारे सगळे चित्रपट हीट ठरत होते, जणू असा एक अलिखित नियमच बनला होता. पण लॉकडाउनच्या काळात ओटीटीने चित्रपटक्षेत्राला खूप मोठा आधार दिला आणि ही गोष्ट आपण मान्य करायलाच हवी. बरेच चित्रपट तयार होते, लोकांना बाहेर पडता येत नव्हतं, त्यामुळे ओटीटी ही चित्रपटांसाठी जीवनदानच ठरलं. यामुळे भारतीय चित्रपटाच्या कक्षादेखील रुंदावल्या. त्यामुळे माझ्यामते तरी ओटीटी हा एक बोनस आहे.”

आणखी वाचा : Photos : “हा चित्रपट आहे की कार्टून…” प्रभासच्या ‘आदिपुरुष’चा टीझर पाहून संतापले नेटकरी

याबरोबरच वरुणने प्राइम व्हिडिओच्या नव्या उपक्रमाबाबत माहिती दिली आहे. या उपक्रमात प्राइम व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या नवीन प्रोजेक्टची माहिती देण्यात येणार आहे. हा एक आगळावेगळा प्रयोग असल्याचं वरुणने सांगितलं आहे आणि यासाठी वरुणने स्वतः वेगवेगळ्या कल्पना सुचवल्याचंही स्पष्ट केलं आहे.

वरुण आणि क्रीती सनोन यांचा ‘भेडिया’ हा चित्रपट २५ नोव्हेंबर २०२२ या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच हॉलिवूडच्या ‘सीटाडेल’ या प्रोजेक्टच्या भारतीय रिमेकवरही वरुण काम करत आहे. यामध्ये वरुणबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री समांथादेखील मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या