विकी कौशल हा आजच्या पिढीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत असतो. विकी कौशलने कतरिना कैफशी गेल्याच वर्षी लग्न केलं. बॉलिवूडमधील विवाहित जोडप्यांमध्ये त्यांची जोडी चाहत्यांची लाडकी आहे. ते दोघंही एकमेकांबद्दल, एकमेकांच्या कामाबद्दल दिलखुलासपणे व्यक्त होता असतात. पण सध्या विकी त्याच्या आगामी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याचा आणि कियाराचा एक रोमॅंटिक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर कतरिनाने तिचं मत व्यक्त केलं आहे.

‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात विकी कियारा आडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सध्या विकीची कियारा यांच्या या चित्रपटातील एका गाण्याची चर्चा रंगली आहे. आज विकीने या चित्रपटातील एका गाण्याचा टीझर पोस्ट करत हे गाणं उद्या रिलीज होणार असल्याचं सांगितलं. ‘बना शराबी’ असं या गाण्याचं नाव आहे. या चित्रपटात विकी आणि कियारा एकमेकांबरोबर रोमान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात कियाराने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला आहेत, तर विकीने काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. इतकंच नव्हे तर ते बाथटबमध्येही रोमॅंटिक मूडमध्ये असल्याचं दिसून येतंय.

हेही वाचा : अथांग समुद्र, रोमान्स आणि वेड्यासारखं प्रेम; चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

विकीने शेअर केलेल्या या गाण्याचा टीझर पाहून चाहत्यांना विकी आणि कियाराची केमिस्ट्री फार आवडली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या बाथटबमधील रोमॅंटिक दृश्य पाहून चाहते या दृश्यांचं आणि कतरिना कैफचं कनेक्शन लावत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने विकीचा उल्लेख करत लिहीलं, “एवढी सोन्यासारखी बायको मिळालेली असूनही दुसऱ्या मुलीबरोबर असा रोमान्स करताना तुला लाज वाटत नाही का?” तर दुसऱ्याने लिहीलं, “हा व्हिडीओ पाहून कतरिनाचा नक्कीच तीळपापड झाला असेल…”

आणखी वाचा : Video: विकी कौशलचा बायकोच्या ‘या’ आयटम सॉंगवर धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे.