बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचे फक्त देशातच नाही तर परदेशातही असंख्य चाहते आहेत. एवढंच नाही तर पाकिस्तानमध्येही आमिरच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. तसेच अनेक पाकिस्तानी कलाकारही आमिरच्या अभिनयाचे चाहते आहेत. अशात आपणही आमिरसारखं दिसावं असं अनेकांना वाटतं पण असं करणं एका पाकिस्तानी अभिनेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. आमिरसारखं दिसण्याच्या नादात या अभिनेत्यावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. याचा किस्सा या अभिनेत्याने स्वतःच एका मुलाखतीत सांगितला. जाणून घेऊया या अभिनेत्याबरोबर नेमकं काय घडलं…

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हा आमिर खानचा खूप मोठा चाहता आहे. आमिरच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे प्रेरित होऊन फवादनेही तशीच बॉडी बनवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हा प्रयत्न त्याला चांगलाच भोवला. एवढंच नाही तर यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. फवादला त्याच्या एका चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायचं होतं. याचा खुलासा त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत केला. पण हे करताना त्याच्याबरोबर जे घडलं ते ऐकल्यावर सर्वच हैराण झाले. फवादला आमिर खान आणि हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चियन बेल यांच्यासारखं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायचं होतं. पण असं होऊ शकलं नाही.

आणखी वाचा- तनुजा यांच्या ‘या’ वाईट सवयीला त्रासल्या होत्या इतर अभिनेत्री, मुलीनेही केला होता मोठा खुलासा

एका मुलाखतीत आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनबद्दल बोलताना फवाद खान म्हणाला, “आमिर खान आणि ख्रिश्चियन बेल यांच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची नक्कल करणं माझ्या अक्षरशः जीवावर बेतलं होतं. माझी तब्येत एवढी बिघडली की मला काही दिवस रुग्णालयात राहावं लागलं. माझ्या किडनी व्यवस्थित काम करू शकत नव्हत्या. मी १० दिवस रुग्णालयात होतो. त्यानंतर पुन्हा अशाप्रकारे काही करण्याचा विचार आता मी अजिबात करू शकत नाही.”

आणखी वाचा- खूपच खास आहे आयरा खान- नुपूर शिखरेची लव्हस्टोरी, जाणून घ्या पहिली भेट ते प्रपोजपर्यंत सर्वकाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फवाद खान पुढे म्हणाला, “मी मधुमेहाचा रुग्ण आहे त्यामुळे माझ्यासाठी हे खूप धोकादायक ठरलं. माझी तब्येत एवढी खराब झाली होती की १० दिवस रुग्णालयात घालवल्यानंतरही मी पूर्णपणे ठीक झालो नव्हतो. यातून पूर्णपणे ठीक होण्यासाठी मला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी लागला.” दरम्यान फवाद खानला त्याच्या ‘द लिजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटासाठी हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायचं होतं. यावेळी अभिनेत्याचं वजन ७५ किलो होतं आणि त्याला ते १०० किलोपर्यंत वाढवायचं होतं.