अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी वेगवेगळ्या कारणासाठी नेहमीच चर्चेत असतात. पलक तिवारी सध्या तिच्या आगामी चित्रपटासाठी चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता अरबाज खान स्टारर ‘रोझी ‘या चित्रपटातुन पलक अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. यात पलक रोझीची प्रमुख भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटात या दोघां व्यतिरिक्त लोकप्रिय अभिनेत्री काजोलची बहीण अभिनेत्री तनिशा मुखर्जी, ‘खतरो के खिलाडी’फेम अभिनेता  शिवीन नारंग देखील मुख्य भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज होऊन बराच काळ लोटला आहे. आज याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये अरबाज खानचा  लुक रिवील करण्यात आला आहे.

अरबाज खानने ‘रोझी-द सॅफरन चॅप्टर’चा टीझर आज ट्विटरवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अरबाज खान एक पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार असल्याचे या टीझरवरून कळत आहे. या टीझरमध्ये अरबाज एका पछाडलेल्या घरात शिरताना दिसत आहे. हा टीझर थीमला पकडून शेवटपर्यंत एक थरारक अनुभव देत आहे. या व्हिडीओत अरबाज खानचा सामना एका भयानक गोष्टीशी होतो. मात्र हा टीझर इथेच संपतो. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आता ट्रेलर पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रोझी-द सॅफरन चॅप्टर’ हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारीत आहे. गुरग्राम येथील बी.पी.ओ.  मध्ये रोझी नावाची मुलगी असते ती अचानक गायब होते. आता या अचानक गायब होण्यामागचे रहस्य काय आहे हे हा चित्रपट रिलीज झाल्यावर उलगडेल. दरम्यान या चित्रपटा विषयी बोलताना पलक तिवारी म्हणाली होती की, ” हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. मला या भूमिकेसाठी खूप अभ्यास करावा लागला… दिग्दर्शक विशाल राजन मिश्रा सर ते निर्मात्या प्रेरणा अरोरा सगळ्यानी मला सपोर्ट केला आहे.

‘रोजी-द सॅफरन चॅप्टर’चा थरारक टीझर तुम्हाला रोजीच्या आयुष्यात काय घडले असू शकते याची झलक दाखवत आहे. तसच आता यामध्ये शिवीन नारंग आणि तनिशा मुखर्जी यांची काय भूमिका असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.