स्टार प्रवाहवरील फुलाला सुंगध मातीचा ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेच्या कथानकात नेहमीच विविध ट्विस्ट पाहायला मिळतात. या मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने साकारली आहे. या मालिकेत सध्या किर्तीचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. सध्या या मालिकेतील एक पडद्यामागचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत किर्ती ही सध्या तारेवरची कसरत करताना दिसत आहे. नुकतंच तिने तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री समृद्धी केळकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने फुलाला सुंगध मातीचा या मालिकेचा बिहाइंड द सीन व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ती उंचावर बांधलेल्या दोरीवरुन हातात काठी घेऊन चालताना दिसत आहे. हे दृश्य चित्रीत करताना ती खूप घाबरल्याचे दिसत आहे. हा भाग मालिकेच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

Timepass 3 box office collection : दगडू आणि पालवीची लव्हस्टोरी हिट की फ्लॉप, ‘टाइमपास ३’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

सध्या व्हायरल होत असलेला हा सीन मालिकेच्या प्रोमोसाठी शूट करण्यात आला आहे. या मालिकेत किर्ती ही सध्या तिची नोकरी सांभाळून घरही सांभाळताना दिसत आहे. या दोन्हीही गोष्टी तिला एकत्र करता येतील का हे सांगण्यासाठी हा प्रोमो शूट करण्यात आला आहे. समृद्धी केळकरने हा व्हिडीओ शेअर करताना छान हटके कॅप्शन दिले आहे. “प्रोमोसाठीची मेहनत… टीप – मी घाबरले नसून तसे एक्सप्रेशन देणं ही त्या प्रोमोची गरज होती”, असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.

‘टाइमपास-३’ पाहिल्यानंतर हृता दुर्गुळेच्या सासूबाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “आता तिच्यात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सध्या या मालिकेत विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेत सध्या किर्ती ही संसार आणि कर्तव्य यात तारेवरची कसरत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात तिचा नवरा म्हणजे शुभम हा खंबीरपणे उभा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता किर्तीने केलेली ही तारेवरची कसरत प्रेक्षकांना पसंतीस पडते की नाही? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.